Posts

केस अर्पन करुण कुठे पुण्य मिळते.....

केस अर्पन करुण कुठे पुण्य मिळते नारळ अर्पन करुण कुठे भाग्य उजळते केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार सोनं- चांदी अर्पन करुण काय मिळते सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव काय उपयोग सांग मानवा अशा या दान धर्माचा ?? कधी शेतक-याला बियाणं दान देऊन बघ कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ कधी एखाद्या उपाश्याला भरवुन बघ कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ कधी एखाद्या वृध्दाश्रमास दान करून बघ कधी एखाद्या आश्रमातील निराधारांवर प्रेम करून बघ एकदा दान धर्माच्या व्याख्या बदलून तर बघ !! जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ..पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत..... सशक्त झालेलं मस्तक कुणाच हस्तक होत नसत.... आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...! असेच कुठेतरी वाचलेले

Cyber crime prevention tips ......

Image
बँकिंग व्यवसाय आधुनिक झाला आणि त्याचबरोबर त्यातील फसवाफसवीचे प्रमाण वाढू लागले. बँक खाते क्रमांक पळवण्यापासून पिन, पासवर्ड चोरण्यापर्यंत तसेच ग्राहकाला फसवून बँक खात्याची माहिती घेण्यापासून ते बँकेची खोटी वेबसाइटच तयार करेपर्यंत या चोरांची मजल गेली आहे. या फसव्या जाळ्यापासून कसे दूर राहावे, याची ही हेल्पलाइन. 1.फिशिंग - फिशिंग दोनप्रकारे करण्यात येते. (अ) पहिल्या प्रकारात एखाद्या अज्ञात मेल आयडीवरून तुम्हाला लॉटरीचे बक्षीस लागले आहे, अशा मजकुराचा मेल येतो. बक्ष‌सिाची रक्कम घेण्यासाठी बँक खाते, एटीएम प‌निकार्ड अशी महत्त्वपूर्ण माहिती मागण्यात येते. नायजेरियन व्यक्ती या प्रकारात मोठ्या प्रमाणात गुंतलेल्या असल्याने या प्रकाराला 'नायजेरियन फ्रॉड' असेही म्हटले जाते. (ब) दुसऱ्या प्रकारात बँकेची खोटी वेबसाइट तयार करून तुम्हाला फसविण्यात येते. अशा खोट्या वेबसाइटच्या लिंकमध्ये https च्या ऐवजी http असे असते. पण केवळ s नसलेल्या या वेबसाइटकडे घाई-घाईत क्लि‌क करून माहिती दिली जाते आणि पैसे गमावण्याची वेळ येते. 2.वॉशिंग - व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलने (व्हीओआयपी) ही फसवणूक केली जात...

Google Input Tools Offline installer

Goto to this link and download 1 st file then you can choose any file which is needed to you..... thanks. या  सॉफ्टवेअर मुळे आपण  कोणत्याही भाषेमध्ये  लिहू  शकतो. इतर कोणताही  स्पेशल  कोर्स  न करता.. फक्त आपण तो  उच्चार इंग्लिश मध्ये  टाईप  करायचा की त्यापुढे आपल्याला हवा असलेला  शब्द दिसेल.. खूप सोपे आहे हे वापरायला...... must try this..... https://drive.google.com/?tab=jo&authuser=0#folders/0B0SOH-KYcrwTLW85c0lzQUJ6Wmc

माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नकोस.....

Image
माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नकोस, कारण..????? तो काही क्षणांचा असणार आहे.. माझ्या देहाला कधी महत्व देऊ नकोस, कारण..????? एक दिवस त्याची राख होणार आहे.. महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना दे, कारण..????? त्या जर तू समजलीस तर, मी सदैव तुझ्यासोबतचं असणार आहे..

रिझर्व्ह बँकेने 31 मार्चनंतर 2005 पुर्वीच्या सर्व मुल्यांच्या चलनी नोटा चलनात काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Image
मुंबई : रिझर्व्ह बँकेने 31 मार्चनंतर 2005 पुर्वीच्या सर्व मुल्यांच्या चलनी नोटा चलनात काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या निर्णयानुसार 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटांचाही समावेश आहे. काळा पैसा आणि नकली नोटांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 31 मार्च 2014 नंतर, 2005 सालापूर्वीच्या सर्व चलनात असलेल्या नोटा चलनातून काढणार आहे. त्यामुळं 1 एप्रिल 2014 पासून लोकांनी 2005 पूर्वीच्या सर्व नोटा बँकांमधून बदलून घ्याव्यात असं आवाहन रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीचं पत्रक आरबीएनं नुकतेच जारी केलं आहे. 2005 पासून रिझर्व्ह बँकेनं चलनी नोटांवर निर्मिती वर्ष टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळं 2005 पूर्वीच्या नोटांवर वर्षच नसल्यानं या नोटा सहज ओळखला येतील. कुठल्याही नोटाच्या खालच्या बाजूस छपाईचे वर्ष छापण्यात आलं आहे. त्यामुळं वर्षाचा उल्लेख नसलेल्या सर्व नोटा बदलून घेण्याचं आवाहन आरबीआयनं केलं आहे. लोकांनी गडबडून न जाता या प्रक्रियेत सहकार्य करावं असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. जू्न्या नोटा वैध असल्या कारणानं ...