नवरा अंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो ..."हाय, गुड मॉर्निंग डियर"(मेसेज फ्रॉम बेबी)सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते. विचारात पडते, ही "बेबी" कोण आता ?नवरा बाथरूममधून आल्यावर बायको त्याला कुण्या बेबीचा मेसेज आल्याचे सांगते. नवरा हसतो. आणि मोबाईल घेऊन रिप्लाय करतो, "हाय बेबी, हाऊ आर यु ?" आणि आपल्या कामाला लागतो. तो रिप्लाय देखीलबायको पाहते. मग दिवसभर डोक्यात विचार सुरू होतात, कोण असेल ही बेबी ? संध्याकाळी नवरा आल्यावरत्याला ती विचारते, "ही बेबी कोण आहे हो ?"नवरा केवळ हसतो आणि उत्तरं न देता आपल्या कामाला लागतो.असेच एक दोन दिवस जातात. पुन्हा एके सकाळी मेसेज येतो, "हाय, आज तरी भेटणार का ? खूप आठवण येतेय तुझी" (मेसेज फ्रॉम बेबी)हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय वाढू लागतो. अधून मधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे, नवराही रिप्लाय द्यायचा आणि हे सगळे पाहून बायकोचा संशय वाढायचा. आणि एकेदिवशी नवऱ्याच्या खिशात सिनेमाची दोन तिकिटे तिला सापडतात.त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते. दोघात कडाक्याचे भांडण होते. तिच्या मनात अढी बसलेल
Comments
Post a Comment