*किशोर मासिक डिजिटायझेशन लोकार्पण*

*किशोर मासिक डिजिटायझेशन लोकार्पण*

सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की, मागील 46 वर्षे मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बालभारतीचे प्रकाशन असलेल्या किशोर मासिकाचे आजवरचे सर्व अंक आता डिजिटल रुपात ऑनलाइन मोफत उपलब्ध झाले आहेत. नाशिक येथे झालेल्या भव्य सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री मा.श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते 30 हजार पानांच्या   या दस्तऐवजाचे लोकार्पण करण्यात आले. या निमित्ताने बालसाहित्याचा मोठा खजाना किशोरप्रेमी वाचकांसाठी खुला झाला आहे. बुकगंगाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून हा प्रकल्प कुठलाही मोबदला न घेता पूर्ण करण्यात आला. दर्जेदार बालसाहित्य आणि अनेक दिग्गज चित्रकारांच्या कलाकृतीचा आनंद या माध्यमातून घेता येणार आहे.  हे सर्व अंक आता बालभारतीच्या वेबसाईटवर सोबतच्या लिंकवर उपलब्ध आहेत.
http://kishor.ebalbharati.in/Archive/

- किरण केंद्रे,
कार्यकारी संपादक, किशोर

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

Google Input Tools offline installer for Hindi and Marathi