रेबीज

🐈🐈रेबीज. ....🐈🐈🐈.

रेबीज मुळे धक्का देणाऱ्या दोन घटना घडल्या म्हणून. ....

रेबीज बाबत थोडी माहिती.

रेबीज म्हणजे पिसाळणे. हा विषाणू पासून होणारा रोग. याचे दोन प्रकार पडतात. 1) मुक्त रेबीज 2) मुका रेबीज.
मुक्त रेबीज होतो तेव्हा प्राणी आक्राळस्ते पणा करतो. पिसळून वागतो. नसा आखडतात . दिसेल त्या वस्तू चा चावा घेतो. पाणी दिसताच वेदना होतात. स्वभाव चिडचिडा होतो.
दुसरा मुका रेबीज. यामध्ये प्राणी सुन्न होतो. पडून रहातो.तोंडातून सतत लाळ येते. डोळे मलुल होतात. पोटातून सतत आचके येतात. विव्हळतात. पण ते जाणीव पुर्वक चावा घेताना दिसत  नाहीत.
       रेबीज चा विषाणू लाळे मार्फत रक्तात नंतर नसेमध्ये जातो. कोणताही प्राणी चावला म्हणजे रेबीज होतोच असे नाही. रेबीज झालेला प्राणी चावल्यास हा रोग होतो. रेबीज विशेषतः लांडगा, कोल्हा,वटवाघळे, पक्षी, रानकुत्री, अशा जंगली प्राण्यांना होतो. असे प्राणी गावभागात येऊन दुसऱ्या प्राण्यांना चावतात. तेव्हा त्याचा प्रसार होतो.

       रेबीज झाल्यावर ताप येतो. त्याचे जंतू थेट नसांमध्ये जातात. पुढे मेंदूवर आघात करतात .याची लक्षणे आठ्ठेचाळीस   तासापासून ते एक वर्षापर्यंत दिसतात.

आपल्याला प्राणी चावल्यास . जखम स्वच्छ धुवा. तीला बांधू नका. अँन्टिसेप्टिक मलम लावा. मग तत्काळ जि प च्या दवाखान्यात लस टोचून घ्या.

आपल्या घरातील कुत्री, मांजरे, यांचे मुके घेऊ नका, त्यांचे अतिलाड करु नका. त्यांना वेळोवेळी फ्रिजर केलेली लस टोचून घ्या.  नखे लागल्यावर, दाताची जखम झाल्यावर निष्काळजीपणा करु नका. गावटी उपचार करत बसू नये. जसे चटणी भाकर खाणे, तेल पिणे इ. रेबीज झाल्यानंतर त्यावर अद्याप औषध नाही. पण तो होऊ नये म्हणून लस आहे. रेबीज झालेला प्राणी चावल्यास घाबरून जाऊ नका. तत्काळ लस टोचून घेतल्यास रेबीज होत नाही.

आपली पाळीव जनावरे इतर प्राण्यांच्या संगतीत ठेवू नयेत, शेतात गेल्यानंतर ससे,माकड, रानकुत्री(कोळशिंडे) कोल्हे यांच्या पासून सावध रहावे.
    काळजी घ्या. निसर्ग वाचवा. जीव वाचेल
       
(वरील माहिती खेडेगावात जरुर पोहोचवा रेबीज बाबत जागृती करा )
CP

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .