Posts

Showing posts from 2015

केस अर्पन करुण कुठे पुण्य मिळते.....

केस अर्पन करुण कुठे पुण्य मिळते नारळ अर्पन करुण कुठे भाग्य उजळते केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार सोनं- चांदी अर्पन करुण काय मिळते सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव काय उपयोग सांग मानवा अशा या दान धर्माचा ?? कधी शेतक-याला बियाणं दान देऊन बघ कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ कधी एखाद्या उपाश्याला भरवुन बघ कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ कधी एखाद्या वृध्दाश्रमास दान करून बघ कधी एखाद्या आश्रमातील निराधारांवर प्रेम करून बघ एकदा दान धर्माच्या व्याख्या बदलून तर बघ !! जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ..पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत..... सशक्त झालेलं मस्तक कुणाच हस्तक होत नसत.... आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...! असेच कुठेतरी वाचलेले

Cyber crime prevention tips ......

Image
बँकिंग व्यवसाय आधुनिक झाला आणि त्याचबरोबर त्यातील फसवाफसवीचे प्रमाण वाढू लागले. बँक खाते क्रमांक पळवण्यापासून पिन, पासवर्ड चोरण्यापर्यंत तसेच ग्राहकाला फसवून बँक खात्याची माहिती घेण्यापासून ते बँकेची खोटी वेबसाइटच तयार करेपर्यंत या चोरांची मजल गेली आहे. या फसव्या जाळ्यापासून कसे दूर राहावे, याची ही हेल्पलाइन. 1.फिशिंग - फिशिंग दोनप्रकारे करण्यात येते. (अ) पहिल्या प्रकारात एखाद्या अज्ञात मेल आयडीवरून तुम्हाला लॉटरीचे बक्षीस लागले आहे, अशा मजकुराचा मेल येतो. बक्ष‌सिाची रक्कम घेण्यासाठी बँक खाते, एटीएम प‌निकार्ड अशी महत्त्वपूर्ण माहिती मागण्यात येते. नायजेरियन व्यक्ती या प्रकारात मोठ्या प्रमाणात गुंतलेल्या असल्याने या प्रकाराला 'नायजेरियन फ्रॉड' असेही म्हटले जाते. (ब) दुसऱ्या प्रकारात बँकेची खोटी वेबसाइट तयार करून तुम्हाला फसविण्यात येते. अशा खोट्या वेबसाइटच्या लिंकमध्ये https च्या ऐवजी http असे असते. पण केवळ s नसलेल्या या वेबसाइटकडे घाई-घाईत क्लि‌क करून माहिती दिली जाते आणि पैसे गमावण्याची वेळ येते. 2.वॉशिंग - व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलने (व्हीओआयपी) ही फसवणूक केली जात...