Posts

Showing posts from July, 2017

*कुस्तीसाठी डायरीलेखन

*कुस्तीसाठी डायरीलेखन * रामराम मंडळी, बरेच दिवस डोक्यात हा विषय मूळ धरून होता की डायरी लेखनाविषयी काहीतरी लिहावे.अनेक यशस्वी उद्योजक,चित्रपट अभिनेते,पत्रकार यासह अनेक क्रांतिकारक सुद्धा डायरी लेखन करत असायचे.आज इतिहासाची जी काही साधने उपलब्ध आहेत त्यापैकी महत्वाची साधने म्हणून ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या पत्रांचा वापर होतो त्या सुद्धा डायरी लेखनाचाच एक भाग होतो.पण कुस्तीसाठी या महत्वाच्या घटकांचा वापर कसा करावा आणि त्यायोगे यश कसे मिळवावे यावर आजचा लेख होय.बरेच प्रश्न व उत्तरे खाली देत आहे. *डायरी लेखन म्हणजे काय ?* डायरी लेखन म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण करावयाच्या सर्व गोष्टींचे अंदाजे नियोजन व रात्री खरच त्याप्रमाणे आपण वागलो का याचा तपशील लिखित स्वरूपात लिहणे होय. *डायरी लेखनाचे फायदे काय ?* डायरी लेखनाचे फायदे खूप आहेत.जगात प्रत्येकाला ईश्वराने 24 तसाच दिले असताना देखील ठराविक लोकच यशस्वी होतात व इतर मागे पडत पडत अयशस्वी जीवन जगतात. याचे मुख्य कारण म्हणजे मिळालेला वेळ आपण ध्येयासाठी न वापरता अनावश्यक गोष्टीसाठी खर्च करत असतो.एकदा वेळ निघून गेली की प्रयत्

आनंदी पालकत्व सेमिनार

आनंदी पालकत्व सेमिनार मांडलेले मुद्दे थोडक्यात So enjoy happy parenting 1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावावी २. घरात आदळआपट मुलांसमोर  करू नका 3. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल बोला 4. मुलांना घालून पाडून बोलू नका , मूल तुम्हाला avoide करेल 5. मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ कर 6.मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा 7.आई साठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे 8. मूल हि investors नाहीत माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका 9. मुलांदेखत कुठलंहि व्यसन करू नका 10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी ! Process समजून सांगा 11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा 12. आपल्या मुलांची need समजून घ्या 13. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना नवरा म्हणून या 14. मुलांना कधीही नाकारात्मक बोलायचं नाही ... नालायका , गधडा वगैर सारखे शब्द वापरून 15. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई ..... मुलांना काहि calc

UPSC/MPSC

''नम्र विनती हा मैसेज प्रत्येकाने किमान २ वेळा नक्की वाचा." 🚓संधी एखादाच येते परत येत नाही.         ✏सर्वांनी आपल्या ताईला, भावाला, मुलाला, मुलीला .UPSC/ MPSC चा अभ्यास करण्यासाठी सांगावे/ मदत करावी. उदा.माझी ताई आत 11 वी गेली तर ती बाकी मुलांपेक्षा तिला 5 वर्षे जास्त मिळाली तर ती लवकर कोणतीही पोस्ट मिळवू शकते. UPSC/MPSC च्या  अभ्यासासाठी तुम्ही जरी रोज 5 तास खर्च केले तरी 5 वर्षांनी तुम्हाला नाव,चांगला पगार ,प्रतिष्ठा सर्व काही मिळेल. खालील पुस्तके आवश्यक वाचण्यास द्यावीत. 1)अधिकारणी   2)गरूड झेप 3) स्टिल फ्रेम 4) ताई मी कलेक्टर होणार 5)राजमुद्रा 6)IAS मंत्रा 7)राज्यसेवा स्पर्धामंत्र अशी अनेक पुस्तके वाचण्यास द्यावित. विचार करा. लवकर सुरवात करूया,आणी करिअर घडवूया.   🙏एमपीएससी म्हणजे काय🙏🏻 👍एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवार

चिनी मालावर बहिष्कार टाकताय ?

चिनी मालावर बहिष्कार टाकताय ? > तुम्ही ज्या मोबाईलवरून चिनी मालाच्या बहिष्काराचे आवाहन करत आहात त्याचे निम्म्यापेक्षा जास्त स्पेअर पार्ट चिनी बनावटीचे आहेत, किंवा तो संपूर्ण फोनच चिनी बनावटीचा आहे.  > तुम्ही जे कॉम्प्युटर वापरताय त्याचे निम्मेअधिक स्पेअर पार्टस चिनी बनावटीचे आहेत.  > जगातील सर्व मोठे ब्रॅण्ड्स चीन मध्ये असेम्बल होतात. > तुमच्या लॅपटॉप मधले अर्ध्यापेक्षा जास्त पार्टस चिनी आहेत. > तुम्ही वापरत असलेल्या वाहनाचे कितीतरी पार्टस चीन मधून आयात केलेले आहेत. > तुमच्या घरात फ्रिज आहे ? मग त्याचे पार्टस चीन मध्ये बनलेले आहेत हे लक्षात ठेवा.  > तुम्ही वापरात असलेली साबण, पावडर, शाम्पू, सेंट, डियो, पावडर यासाठी लागणारे कितीतरी केमिकल्स चीनमधून आयात होतात.  > तुमच्या घरात असणाऱ्या प्लास्टिक वस्तूंपैकी कितीतरी वस्तू चीनमधून आयात केलेल्या आहेत, किंवा त्याचा कच्चा माल चीनमधून आणलेला आहे.  > तुम्ही बाहेर एखाद्या शोरूम मधून फर्निचर विकत घेतलेलं आहे ? मग तेसुद्धा चीन मधून आयात केले असण्याची ८०% शक्यता आहे.  > तुमच्या घरात सोलर वॉटर हिटर आहे? मग तो ए