Posts

Showing posts from 2014

Google Input Tools Offline installer

Goto to this link and download 1 st file then you can choose any file which is needed to you..... thanks. या  सॉफ्टवेअर मुळे आपण  कोणत्याही भाषेमध्ये  लिहू  शकतो. इतर कोणताही  स्पेशल  कोर्स  न करता.. फक्त आपण तो  उच्चार इंग्लिश मध्ये  टाईप  करायचा की त्यापुढे आपल्याला हवा असलेला  शब्द दिसेल.. खूप सोपे आहे हे वापरायला...... must try this..... https://drive.google.com/?tab=jo&authuser=0#folders/0B0SOH-KYcrwTLW85c0lzQUJ6Wmc

माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नकोस.....

Image
माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नकोस, कारण..????? तो काही क्षणांचा असणार आहे.. माझ्या देहाला कधी महत्व देऊ नकोस, कारण..????? एक दिवस त्याची राख होणार आहे.. महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना दे, कारण..????? त्या जर तू समजलीस तर, मी सदैव तुझ्यासोबतचं असणार आहे..

रिझर्व्ह बँकेने 31 मार्चनंतर 2005 पुर्वीच्या सर्व मुल्यांच्या चलनी नोटा चलनात काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Image
मुंबई : रिझर्व्ह बँकेने 31 मार्चनंतर 2005 पुर्वीच्या सर्व मुल्यांच्या चलनी नोटा चलनात काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या निर्णयानुसार 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटांचाही समावेश आहे. काळा पैसा आणि नकली नोटांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 31 मार्च 2014 नंतर, 2005 सालापूर्वीच्या सर्व चलनात असलेल्या नोटा चलनातून काढणार आहे. त्यामुळं 1 एप्रिल 2014 पासून लोकांनी 2005 पूर्वीच्या सर्व नोटा बँकांमधून बदलून घ्याव्यात असं आवाहन रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीचं पत्रक आरबीएनं नुकतेच जारी केलं आहे. 2005 पासून रिझर्व्ह बँकेनं चलनी नोटांवर निर्मिती वर्ष टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळं 2005 पूर्वीच्या नोटांवर वर्षच नसल्यानं या नोटा सहज ओळखला येतील. कुठल्याही नोटाच्या खालच्या बाजूस छपाईचे वर्ष छापण्यात आलं आहे. त्यामुळं वर्षाचा उल्लेख नसलेल्या सर्व नोटा बदलून घेण्याचं आवाहन आरबीआयनं केलं आहे. लोकांनी गडबडून न जाता या प्रक्रियेत सहकार्य करावं असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. जू्न्या नोटा वैध असल्या कारणानं