Posts

Showing posts from September, 2017

ऊद्योजक

जे काम तुम्ही ईतरांसाठी पगार घेऊन करता तेच काम तुम्हाला स्वतःसाठी करा म्हटलं तर बोबडी वळते प्राॅब्लेम हा नाहीये की आपल्याला व्यवसायाचं ज्ञान नाहीये, प्राॅब्लेम हा आहे की आपल्यात डेअरींग नाहीये. टाटांना, धीरुभाईंना कुणी व्यवसाय शिकवला नव्हता, ना बिल गेट्स ला कुणी घरबसल्या गिऱ्हाईक आणुन दिलं होत. ऊद्योजक काय आकाशातुन पडलेले नाहीत. फक्त मानसिकतेचा खेळ आहे तुम्ही नोकरीच्या मागे पळता, ऊद्योजक व्यवसायाच्या मागे पळतात. तुम्ही पगार मिळवण्याचा विचार करता, हे लोक पगार वाटण्याचा विचार करतात तुम्ही जगण्यासाठी धडपड करता, हे लोक जगण्याचा आनंद घेण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही ऊद्याच काय याचा विचार करता, हे लोक आणखी काय करायचं याचा विचार करतात.  तुमची स्वप्ने घर आणि गाडी यातच संपतात, किंवा काश्मीर टुर पर्यंत लांबतात, यांची स्वप्ने ईथपासुन सुरु होतात. तुम्ही नशीबाला दोष देतात, हे लोक नशीबाचंच नशीब ऊजळवतात.  तुम्ही कारणे शोधतात, हे लोक कारणांवर ऊत्तरे शोधतात. तुम्ही तोट्याचा विचार करता, हे लोक नफ्याची आकडेवारी मांडतात. तुम्ही डुबलो तर काय याचा विचार करता, हे लोक डुबलो म्हणुन काय होईल? माझ स

जो खिलाडूवृत्तीनं पराभव स्वीकारतो तोच या जगात यशस्वी होतो.

रविवारची सुट्टी होती म्हणून एका मित्राच्या घरी गेलो होतो.आम्ही गप्पा मारत बसलो होतो इतक्यातच त्याचा मुलगा आला. " काय रे कुठं गेला होतास ? " मी विचारलं. " क्लासला." एवढा एकच शब्द बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला. त्याच्या वडिलांनी नंतर त्याला हाक मारली " अरे ये ना , काका आलेत बघ." "ते काय म्हणतात ते तर बघ ." वगैरे म्हणून बऱ्याच हाका मारल्या तरी तो बाहेर आला नाही. " काय बिघडलंय ? " मी विचारलं. " आज सहामाहीचे मार्क कळले ना ! दोन विषयांत नंबर हुकलाय ! " त्याची आई हसत हसत म्हणाली. " मग काय झालं ? " मी म्हटलं , " एखाद्या विषयात चार दोन मार्क कमी पडले तर बिघडलं कुठं ? " " ते आपल्याला झालं! त्याचं तसं नाही.एखाद्या विषयात एखादा गुण कमी मिळाला किंवा एखाद्या विषयातला नंबर चुकला तरी त्याला तो पराजय वाटतो." " चुकीचं आहे हे !" मी म्हटलं," तो कुठले खेळ वगैरे खेळत नाही काय ?" " मुळीच नाही." त्याची आई बोलली ," तो अभ्यास सोडून दुसरं काहीही करत नाही आणि आम्हीही त्याला कधी