केस अर्पन करुण कुठे पुण्य मिळते.....
केस अर्पन करुण कुठे पुण्य मिळते नारळ अर्पन करुण कुठे भाग्य उजळते केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार सोनं- चांदी अर्पन करुण काय मिळते सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव काय उपयोग सांग मानवा अशा या दान धर्माचा ?? कधी शेतक-याला बियाणं दान देऊन बघ कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ कधी एखाद्या उपाश्याला भरवुन बघ कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ कधी एखाद्या वृध्दाश्रमास दान करून बघ कधी एखाद्या आश्रमातील निराधारांवर प्रेम करून बघ एकदा दान धर्माच्या व्याख्या बदलून तर बघ !! जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ..पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत..... सशक्त झालेलं मस्तक कुणाच हस्तक होत नसत.... आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...! असेच कुठेतरी वाचलेले