माझे कोणावाचून काही अडत नाही
नक्की वाचा खुप छान पोस्ट....
*माझे कोणावाचून काही अडत नाही*
😐😐😐😐
रात्री 2 वाजता अचानक फोन वाजला. थोड्या काळजीनेच उचलला. तर समोरून वरूण बोलत होता. "काका, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या मधूला ऍडमिट केलेय. आणि डॉ. म्हणतात घरातील मोठ्या माणसाना बोलवा." मी येतो बोलून फोन ठेवला आणि बायकोला घेऊन निघालो. जाता जाता नकळत मन भूतकाळात गेले.
😀
वरूण एक I.T. इंजिनियर. MBA अतिशय हुशार मुलगा. माझा दूरचा नातेवाईक पण जवळच राहणारा.आईवडील गावी. तसा तो स्वभावानी हेकट. माझे कोणावाचून काही अडत नाही या वृत्तीचा. *माझा मोबाइल आणि इंटरनेट हेच माझे विश्व असे मानणारा.*
😀
दोन वर्षांपूर्वी अचानक घरी पेढे घेऊन उभा राहिला."काका, लग्न ठरलंय. मी ताबडतोब मोठेपणाचा आव आणून विचारले "अरे वा!!! कधी ,?? कुठे पाहिलीस मुलगी ?? कोणी ठरविले??? तो फक्त हसला "काका काय गरज आहे कोणाची ?? एका साईट वर तिला पाहिले, आवडली. विडिओ पाहिला तिचा. तिचा आणि माझा प्रोफाइल जुळला आणि आम्ही ठरविले. इथून जात होतो म्हणून तुम्हाला सांगायला आलो." अभिनंदन, मग आता पत्रिका कधी छापूया, खरेदी वगैरे. माझा मोठेपणा चालू झाला. तर तो जोरात हसला "काहीही गरज नाही. मी व्हाट्स अॅप वरून सगळ्यांना आमंत्रणे पाठवली आहेत, आणि खरेदीही ऑनलाइन केली आहे. इथे वेळ कोणाला आहे ? खूप कामे असतात." माझा थोडा हिरमोड झाला ,म्हटले " अरे बायकोला तरी वेळ देतोस का ??? " नाही हो, तीही माझ्यासारखी बिझीच. मग वेळ मिळेल तेव्हा व्हाट्स अॅपवर चाट करतो सेल्फी काढतो, विडिओ पाठवतो". मी न राहवून हाथ जोडले.
😀
काही दिवसांनी आम्ही त्याच्या लग्नाला गेलो, फक्त 50 माणसे हजर पाहून धक्काच बसला. स्टेजवरही आहेर द्यायला गर्दी नव्हती. अरे ह्याने आहेर आणू नये असे लिहिले होते कि काय ??? ह्या विचाराने थोडा सुखावलो. भेटायला गेलो तेव्हा विचारलं "इतकी कमी माणसे कशी आली ???" तेव्हा परत तो हसला आणि म्हणाला " सगळ्यांनी व्हाट्स अॅपवर अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या आहेत. तो बघा एक माणूसच खास रिप्लाय द्यायला ठेवलाय. मी उडालोच."बरे आहेरचे काय ???" माझा बालसुलभ प्रश्न?? त्यानेहि लहान मुलाला समजवावे तसे मला सांगितले "अहो काका, प्रत्येकाच्या घरी मिठाई आणि गिफ्ट्स पाठवले आहे curriar ने अगदी घरपोच डिलिव्हरी". धन्य आहेस बाबा तू. मी हाथ जोडले आणि पोटभर जेवून निघालो.
😀
दुस-या दिवशी पूजेला गेलो पण यावेळी घरात 6 माणसे बघून मुळीच आश्चर्य वाटले नाही. सर्व कसे आरामात बसले होते. म्हटले अजून भडजी आले नाही वाटते?? तेव्हा उत्तर आले "अहो काका रेकॉर्ड लावून पूजा केली अगदी पूर्णपणे कुठेही शॉर्टकट नाही. कशाला हवाय भडजी?? प्रसादाची ऑर्डर दिलीय आता येईल, शिवाय 15 माणसांच जेवण सांगितले आहे. चला म्हणजे माझे जेवण होईल इथे. मी सुखावलो. परत एकदा पोटभर जेवून समाधानाने घरी आलो.
😀
काही दिवसांनी तो रस्त्यात भेटला,एकटाच होता म्हणून विचारले "अरे कुठे गेलास कि नाही हनिमूनला "? तर नेहमीसारखे हसून बोलला कुठे वेळ आहे काका ?? तीही नवीन प्रोजेक्टमध्ये बिझी अणि मीही. मी अचंबित झालो. मग मित्रत्वाच्या नात्याने त्याच्या खांदयावर हाथ ठेवुन विचारले "कधीतरी सेल्फी आणि व्हिडिओ", कप्पाळ!!!! मग नाटक सिनेमा तरी ??? अहो नवीन चित्रपट आला कि downoad करतो आणि पाहिजे तेव्हा बघतो. वेळही वाचवतो. मी दरवेळी नवीन नवीन धक्के खात घरी येत होतो.
😀
आता काही महिन्यापूर्वी त्याचा messege आला बायकोला दिवस गेले आहेत. पटकन मनात आले.... "हेही ऑनलाईन नाही ना??" फोन करून त्याचे अभिनंदन केले आणि काही मदत पाहिजे का असे विचारले. पुन्हा त्याचे परिचित हास्य ऐकून नवीन काय ऐकायला मिळेल याची उत्सुकता लागली. त्याने सांगितले काही गरज नाही काका. हिचे सर्व काही करण्यासाठी एका कंपनीला ऑनलाइन पॅकेज दिले आहे. आता ते लोक हिची व्यवस्थित काळजी घेतील मला फक्त बाळाला हातात घ्यायचे आहे..हे मात्र अतीच झाले, मी थोडा चिडलोच आणि तणतणतच घरी आलो.
😀
हॉस्पिटलमध्ये शिरत असताना हे सर्व आठवले आणि समोरच हा उभा राहिला. रडवेला चेहरा, खांदे झुकलेले, आम्हाला बघून त्याचा बांध फुटला. माझ्या कुशीत शिरून हमसाहमशी रडू लागला. मी विचारले "अरे काय झाले, तू तर पॅकेज दिले होतेस ना ?? मग अचानक काय झाले ?? तर म्हणाला त्यांनी मधूची क्रिटिकल कंडिशन पाहून हाथ वर केले, डॉक्टरांनीहि सांगितले तुमचे कोणीतरी नातेवाईक बोलवा परिस्थिती गंभीर होत चालली आहे. इथे मला सगळ्यांनी एकटेच सोडले सगळेजण भावनाशून्य चेहऱ्यानी वावरत होते. त्यांना फक्त त्यांच्या पॅकेजशी मतलब आहे. आज मला जाणवले *आपलेपणाची भावना असलेले पॅकेज कितीही किंमत दिली तरी विकत मिळत नाही.अजून ही वेळ गेली नाही **
आपली माणसे सांभाळा माणूस गेला की परत येत नाही ,मग फक्त आठवणी राहतात *लॅपटॉप टीव्ही मोबाईल बाजूला ठेवा आणि आपल्या स्वतःच्या माणसाशी प्रेमाचे दोन शब्द बोला, तेच तुम्हाला प्रेम देतील*
समजले तर खूप मिळवले
😀😀😀
हे मी लिहिलेले नाही ज्यांनी लिहिले त्यांचे मनपूर्वक आभार....
Comments
Post a Comment