*कुस्तीसाठी डायरीलेखन

*कुस्तीसाठी डायरीलेखन*

रामराम मंडळी,

बरेच दिवस डोक्यात हा विषय मूळ धरून होता की डायरी लेखनाविषयी काहीतरी लिहावे.अनेक यशस्वी उद्योजक,चित्रपट अभिनेते,पत्रकार यासह अनेक क्रांतिकारक सुद्धा डायरी लेखन करत असायचे.आज इतिहासाची जी काही साधने उपलब्ध आहेत त्यापैकी महत्वाची साधने म्हणून ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या पत्रांचा वापर होतो त्या सुद्धा डायरी लेखनाचाच एक भाग होतो.पण कुस्तीसाठी या महत्वाच्या घटकांचा वापर कसा करावा आणि त्यायोगे यश कसे मिळवावे यावर आजचा लेख होय.बरेच प्रश्न व उत्तरे खाली देत आहे.

*डायरी लेखन म्हणजे काय ?*

डायरी लेखन म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण करावयाच्या सर्व गोष्टींचे अंदाजे नियोजन व रात्री खरच त्याप्रमाणे आपण वागलो का याचा तपशील लिखित स्वरूपात लिहणे होय.

*डायरी लेखनाचे फायदे काय ?*

डायरी लेखनाचे फायदे खूप आहेत.जगात प्रत्येकाला ईश्वराने 24 तसाच दिले असताना देखील ठराविक लोकच यशस्वी होतात व इतर मागे पडत पडत अयशस्वी जीवन जगतात. याचे मुख्य कारण म्हणजे मिळालेला वेळ आपण ध्येयासाठी न वापरता अनावश्यक गोष्टीसाठी खर्च करत असतो.एकदा वेळ निघून गेली की प्रयत्न करण्यात सुद्धा अर्थ नसतो.त्यामुळे वेळेचा प्रभावी वापर करायचे असेल तर करावयाच्या गोष्टी लिखित स्वरूपात असल्या पाहिजेत.प्रत्येक माणसाने डायरी लेखन करावे मात्र माझा विषय कुस्ती असल्याने पैलवानांनी स्वतःच्या करियर साठी या गोष्टीचा उपयोग जास्तीत जास्त केला पाहिजे व यश मिळवले पाहिजे.पैलवान कुस्ती मेहनत खुराक हे करतच असतात पण बौद्धिक व्यायाम करण्यासाठी डायरी लेखन उपयुक्त आहे.आपण जर डायरी लिहाल तर वर्षाअखेर तुमचे संपूर्ण वर्ष शब्दरूपी तुमचा हातात असेल व त्यानंतर तुम्हाला समजू लागेल की आपण वेळ कसा घालवला व किती आपल्या उपयोगी पडला ते.

*कशी लिहावी डायरी ?*

डायरी लिहताना आपले ध्येय काय हे स्पष्ट असावे.कोणाचे ध्येय 5 वर्षाचे,कोणाचे वर्षाचे तर कोणाचे 6 महिन्याचे देखील असू शकते.जे काही ध्येय असेल ते सुस्पष्ट लिहावे व ते मिळवण्यासाठी तुमच्या स्वतःच्या डोक्याने नियोजन करावे ,जसे की रोजचा व्यायाम,रोजचा आहार,मनाला दुखवणार्या घटना,मनाला सुखवणार्या घटना यासह सकाळपासून रात्रीपर्यंत करायच्या गोष्टी लिहाव्यात.रात्री झोपताना लिहलेल्या गोष्टी आपण खरोखर केल्या का ते पहावे.केले असल्यास पेनाने बरोबर करा,नसेल तर फुली मारा.फुली मारलेल्या गोष्टी का केल्या नाहीत त्याचे शॉर्ट मध्ये कारण लिहावे.रोज छोटेसे ध्येय धरा,ते पूर्ण करा व ते सुद्धा लिहा.असे दररोज करा.सुट्टीच्या दिवशी आठवड्यातील गोष्टींचे सिंहावलोकन करा.असे केल्याने तुमची तुलना तुमच्याशी सुरू होईल आणि बघता बघता तुमचा एक सेकंदसुद्धा वाया जाणार नाही.

*डायरी लिहताना कोणती सावधानता बाळगावी ?*

डायरी बरोबर आपण प्रामाणिक असतो,त्यात जे लिहतो ते सत्यच असते त्यामुळे तुमची डायरी ही केवळ तुम्हाला माहिती असेल अश्या ठिकाणी ठेवावी,दुसऱ्याला समजली तर तुमची गुपिते त्याला समजली जातात.याचा तोटा सुद्धा होऊ शकतो.शक्यतो महत्वाची गुपिते ही तुम्ही तुमच्या सांकेतिक भाषेत लिहावीत.त्यासाठी चिन्हे,शब्द हे संकेतीक वापरावीत.
हल्ली प्रत्येकजण अँड्रॉइड फोन वापरतो जो आपण सर्वत्र घेऊन फिरतो, त्यामुळे अँप्स स्वरूपात मिळणाऱ्या डायऱ्या सुद्धा वापरू शकता,ज्यात केवळ शब्द नव्हे तर फोटो,आवाज,video सुद्धा सेव्ह करू शकता,ज्याचा बॅक up सुद्धा गुगल वर store करू शकता.त्यामुळे अश्या डायऱ्या वापरण्यास हरकत नाही असे मला वाटते.
काही डायरी लिंक खाली देत आहे,आपण प्रयोग करू शकता.

https://play.google.com/store/apps/details?id=com.Glitter.Private.Secret.Diary

*डायरीमध्ये काय नियोजन लिहावे,काही मार्गदर्शक मुद्दे*

1) आपले ध्येय काय असावे,जसे की महाराष्ट्र केसरी,हिंदकेसरी,राष्ट्रकुल स्पर्धा, ऑलिम्पिक इत्यादी.लक्षात ठेवा ध्येय जितके उच्च तितकेच यश मिळत असते,ध्येय उच्च असावे.
2) दररोज करायचा व्यायाम
3) खुराक
4) पैशाचे नियोजन
5) शारीरिक दुखपतीच्या नोंद
6) मनाला दुःखी व सुखी करणाऱ्या घटना
7) दररोज एखादा सुविचार,छोटेसे ध्येय
8) मित्र,कुटुंब,याना द्यायचा वेळ

यासह एक महत्वाची गोष्ट म्हणजे आठवड्यातून एक दिवस तुम्ही सुट्टी ठेवा.ज्यामध्ये कोणतेही नियोजन,ध्येय ठेऊ नका.मनाला येईल तसे,येईल तिकडे आणि हवे तसे वागा,कोणतीही बंधने घेऊ नका.आपण माणूस आहोत मशीन नव्हे,एखादा दिवस मनसोक्त जगल्याने ध्येयासाठी लागणारी ऊर्जा पुन्हा तुम्हाला मिळेल.

यासह अजून काही प्रश्न,शँका मला कंमेंट्स विचारू शकता.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .