ऊद्योजक

जे काम तुम्ही ईतरांसाठी पगार घेऊन करता तेच काम तुम्हाला स्वतःसाठी करा म्हटलं तर बोबडी वळते

प्राॅब्लेम हा नाहीये की आपल्याला व्यवसायाचं ज्ञान नाहीये, प्राॅब्लेम हा आहे की आपल्यात डेअरींग नाहीये.

टाटांना, धीरुभाईंना कुणी व्यवसाय शिकवला नव्हता, ना बिल गेट्स ला कुणी घरबसल्या गिऱ्हाईक आणुन दिलं होत. ऊद्योजक काय आकाशातुन पडलेले नाहीत. फक्त मानसिकतेचा खेळ आहे

तुम्ही नोकरीच्या मागे पळता, ऊद्योजक व्यवसायाच्या मागे पळतात.
तुम्ही पगार मिळवण्याचा विचार करता, हे लोक पगार वाटण्याचा विचार करतात
तुम्ही जगण्यासाठी धडपड करता, हे लोक जगण्याचा आनंद घेण्यासाठी प्रयत्न करतात.
तुम्ही ऊद्याच काय याचा विचार करता, हे लोक आणखी काय करायचं याचा विचार करतात. 
तुमची स्वप्ने घर आणि गाडी यातच संपतात, किंवा काश्मीर टुर पर्यंत लांबतात, यांची स्वप्ने ईथपासुन सुरु होतात.
तुम्ही नशीबाला दोष देतात, हे लोक नशीबाचंच नशीब ऊजळवतात. 
तुम्ही कारणे शोधतात, हे लोक कारणांवर ऊत्तरे शोधतात.
तुम्ही तोट्याचा विचार करता, हे लोक नफ्याची आकडेवारी मांडतात.
तुम्ही डुबलो तर काय याचा विचार करता, हे लोक डुबलो म्हणुन काय होईल? माझ स्कील जीवंत आहे असा विचार करतात.
तुम्ही हरण्याचा विचार करता, हे लोक जिंकण्याचा विचार करतात...

व्यवसाय म्हणजे काय राॅकेट सायन्स नाही... फक्त मानसिकतेचा खेळ आहे.

तुमच्याच माहितीसाठी... मी स्वतः वकील आहे. माझं अख्ख घराणं वकिलीत आहे. वकिली क्षेत्रात माझं कुटुंब महाराष्ट्रात नावाजलेलं आहे. पण माझ्या पिढ्यानपिढ्या कुणी व्यवसाय केलेला नाही. ऊच्च न्यायालयात चालु असलेली आणि तयार पाया असलेली प्रॅक्टीस सोडुन व्यवसायात आलो. व्यवसाय करायचा या एकाच जिद्दीने. काय करायचं ते नंतर बघु, पण व्यवसाय करायचा हे निश्चित होतं. व्यवसायाची घंटा काही माहिती नव्हती. फक्त काहीतरी करायचं, व्यवसाय करायचा एवढा एकच विचार २४ तास डोक्यात घोळत असे. एक संधी मिळाली, एका कंपनीची फ्रँचाईजी घेतली. त्यावेळी फ्रँचाईजी म्हणजे काय हेसुद्धा कळत नव्हतं. ईंटरनेट मोडेम साठी कंपनी नावाजलेली होती. पण मोडेम म्हणजे काय माहीत नव्हतं. पाच दहा ठिकानाहुन माहिती घेतल्यानंतर मोडेम चा अर्थ कळाला. व्यवसाय सुरु केला. सेल्स म्हणदे काय कळत नव्हतं. पण हे प्रोडक्ट विकायचंय एवढं मात्र कळत होतं.  ज्या दिवशी शाॅप सुरु केलं त्याच दिवशी चार मोडेम विकले होते. कुणाचं मार्गदर्शन नाही, कुणाचा पाठींबा नाही. एखादी गोष्ट करायची ठरवलं आणि तिच्याबद्दल कसलीही माहिती कुठुनही मिळण्याची शाश्वती नसली की तुम्ही स्वतःहुनच तीचे कांगोरे समजुन घेत असता, स्वतःला त्यादृष्टीने घडवत असता. माझ्या बाबतीतही तेच झालं. स्वतःच स्वतःला घडवत गेलो. तयार होत गेलो. व्यवसाय वाढवत गेलो. आणखी काही व्यवसाय सुरु केले. कोणताही अनुभव नसताना स्वतःच व्यवसाय विश्व तयार करत गेलो. वकीली क्षेत्रात घराच नाव मोठं असल्यामुळे लोक येऊन चेष्टा करायचे. पण तरिही शांत होतो, कारण मी एकच उद्दीष्ट घेऊन चाललो होतो, व्यवसाय करायचा. काहीही झालं तरी व्यवसाय करायचा. आजही करतोय.

व्यवसाय हे खरंच राॅकेट सायन्स नाहीये राव. सुरुवात करा, सगळं काही आपोआप होतं.
एक लक्षात ठेवा, व्यवसायात कधीच नुकसान होत नसतं. होते ती फक्त गुंतवणुक. पैसे संपत संपत अगदी शुन्य होतील, पण शुन्याच्या खाली जाऊ शकत नाही. आणि शुन्याची ताकद खुप मोठी असते. गमवायला काहीच नसतं त्यावेळी कमावण्याची संधी जास्त असते.... सुरुवात करा. यशस्वीच व्हाल, विश्वास ठेवा.

उद्योजक व्हा...
समृद्ध व्हा...
_____
Cp

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .