विध्यार्थ्याच्या पालकांचा प्रश्न .

विध्यार्थ्याच्या पालकांचा प्रश्न .

प्रश्न :-
माझा पाल्याने कोणत्या शाखेत जावे , मेडिकल , इंजिनिअरिंग , फार्मसी , ऍग्री कोणत्या युनिव्हर्सिटीत घालणे चांगले राहील , मार्गदर्शन करावे .

उत्तर :- 
१) करिअर म्हणजे काय हे मूलभूत समजून घ्या . डॉक्टर , इंजिनिअर इ होणे म्हणजे करिअर नव्हे . समजा तो डॉक्टर झाला पण प्रॅक्टिस चाललीच नाही  किंवा इंजिनिअर झाला पण नोकरीच नाही लागली तर . करिअर म्हणजे बाजारात विकायला असलेली पदवी घेणे म्हणजे करिअर नव्हे , तर करिअर म्हणजे एक बुद्धिवान व कौशल्यावाण व्यक्ती बनून आपल्या आवडी व मार्केट मधील गरजांचा अंदाज घेऊन आपली सर्वोत्तम क्षमता सिद्ध करणे होय.

२) पैसा हा तर महत्वाचा आहेच पण ते साध्य नाही ते साधन आहे , तुमचा मुलगा जेव्हा त्याची सर्वोच्च क्षमता सिद्ध करेल तेव्हा तो त्या क्षेत्रातला मास्टर असेल व पैसा त्याच्या मागे येईल , त्याला पैस्याच्या मागे धावण्याची गरज नाही . आपण जेवढे पैश्याच्या मागे धावतो तेवढा पैसे लांब पळतात हे ९९% लोकांना समजतच नाही .

३) गर्दीचा भाग होऊ नका , आज १३ लाख इंजिनिअर पास होतात व फक्त लाख भरणा नोकरी मिळते तीही १०/१५ हजाराची, प्रत्येक डॉक्टर हॉस्पिटल टाकत नाही, नोकरी करणाऱ्या डॉक्टर वर टारगेट ची तलवार असते , किती BAMS डॉक्टर कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्या इतपत पैसे कमवितात.

४)युनिव्हर्सिटी की युनिव्हर्स :- कृत्रिम पुस्तकांचा टीवल्या बावल्याचा खेळ म्हणजे युनिव्हर्सिटी , नाहीतर पदवीधर ५-१० हजाराच्या नोकरीची भीक मागत फिरला असता का ? एवढे इंजिनिअर आहेत म्हणे मग प्लॅम्बर, सुतार, इलेकंट्रीशीअन, गवंडी ई हे सगळे बाहेरून का आणावे लागतात, कारण आपल्या इंजिनिअरला फुजपण लावता येते का ? का लगेच ए सि केबिन पाहिजे . युनिव्हर्स म्हणजे घर व शाळा या बाहेरची दुनिया , प्रॅक्टिकल , मार्केट , बाजार, समाज ई ई , उद्या ह्याच जगात त्याला लढायचे व जिंकायचे आहे त्यामुळे त्याला १२ वि नंतर युनिव्हर्स मध्ये पाठवा.

५) नेमके काय करावे :- त्याची आवड , क्षमता, संधी व तुमची पैसे खर्च करण्याची तयारी याचा विचार करून स्किल ओरिएंटेड असे कोर्स करा, self education ला महत्व द्या, पदवी पेक्षा घेतलेले शिक्षण त्याला self reliance करेल हे महत्वाचे , जसे उंचावरून फेकलेले मांजर चार पायावरच बरोबर उभे राहते तसे मुलाला सक्षम बनवायला हवे , कारण उद्याच्या जगात डॉक्टर होवो इंजिनिअर होवो नाही आणि काही होवो , कुणाचे काय होईल हे आज सांगता येत नाही , कोणत्याही स्थितीला सामोरे जाणारी personality  हवी . तो खेळाडू, हॉटेलिएर, डिझायनर , ऍड मेकर , लेखक, शेतकरी , पेंटर , व्यापारी , exporter, ई ई ई हजारो पर्याया पैकी का नाही होऊ शकत . डॉक्टर इंजिनिअरलाच टिळा लावलाय का ?

६) शिक्षण घेण्यावर किती खर्च करावा याचे व्यवहारी तारतम्य हवे , शिक्षनाच्या अड्ड्यावर जुगार खेळू नका , पदव्या ऐवजी ज्ञान घेण्यावर भर हवा. १० लाख पदविवर खर्चून त्याच्या व्याजा एवढ्या पगाराची नोकरी लागू नये हा तर स्वतःच डोळे बांधून खेळलेला जुगार नव्हे का ? ज्या जुगारात पैसे व मुलांचे आयुष्य ही हरते .

आपल्या पाल्याचे जीवन यशस्वी करण्यासाठी त्याच्या अभ्यासाच्या सवयीमध्ये योग्य ते बदल करा.
१) कमीतकमी पाठांतर  ,समजून घेण्यावर अधिक भर द्यायला सांगा. २) प्रत्येक घटकाचे आकलन होईल याची काळजी घ्या. ३) वाचन केलेल्या घटकांचे विश्लेषण (analysis ) करण्याची सवय लावा . ४) पुस्तके(text books) वाचून ,स्वतःच्या भाषेत प्रश्नांची उत्तरे तयार करायला सांगा . ५) प्रत्येक धडा समजून घेऊन  सारांश लक्षात ठेवता आला तर अतिउत्तम.
     काळजी घ्या ,सद्याचे शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या विकासाला पूरक असण्याऐवजी मारक ठरत आहे. आपल्या पाल्याची प्रगती त्याला मिळणाऱ्या एकुण गुणामधून शाळा अंतर्गत गुण (internal marks ) वजा  करून राहीलेल्या गुणावरून ठरावा आणि यावरूनच पुढील शिक्षणासाठीची योग्यता ठरवा.
      याचा गांभीर्याने विचार करा नाहीतर पुढच्या पिढ्या बरबाद होतील.

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story