मुलींना 'बाई' करण्याची घाई
राधिका ताई च्या फॅशन च्या विषयावरून शुभा प्रभू साठम यांचा लोकमत सखी मधील लेख शेअर करतेय... खरंच गरज असते का अश्या फॅशनची... आपणच नकळत काय करतो याची जाणीव पण होत नाही... मुलींना 'बाई' करण्याची घाई लग्नसमारंभ, सोहळे, पार्ट्या पाहा... त्यात लहान मुलींना त्यांच्या आया कसे कपडे घालतात?? जरतारी, उठावदार, शरीराचे आकार-उकार सांगणारे, उघड्या पाठीपोटाचे, कधी तंग, कधी झिरझिरीत कपडे. आणि हायहिल्स. अगदी पाच-सहा वर्षांची ठकीपण लिपस्टिक लावून हायहिल्स घालून ठुमकत असते. हे ठुमकणं बालसुलभ नसून स्त्री सुलभ असतं. मॉडर्न कपडे घालण्याच्या नावाखाली त्या वयात बिनधास्त खेळण्याचं मुलींचं स्वातंत्र्य आपण का हिरावून घेतो? - शुभा प्रभू-साटम एक असाच घरगुती समारंभ.. अनेकदा अशा ठिकाणी मी त्रयस्थ निरीक्षकाच्या भूमिकेत असते. खूप नव्या गोष्टी कळतात. मुख्य म्हणजे मला माणसं पहायला आवडतात. सामील न होता उत्सुक अलिप्ततेने मी माणसांचं वागणं, लकबी, तºहा टिपत असते. (अर्थात यात टीकेचा भाग मुळीच नसतो हे आधीच स्पष्ट करतेय.) इतक्या नव्या नव्या गोष्टी कळतात. इंग्रजीत एक म्हण आहे, मुखपृष्ठावरून पुस्तकाला जोखू नका ती इ