रिझर्व्ह बँकेने 31 मार्चनंतर 2005 पुर्वीच्या सर्व मुल्यांच्या चलनी नोटा चलनात काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.



मुंबई : रिझर्व्ह बँकेने 31 मार्चनंतर 2005 पुर्वीच्या सर्व

मुल्यांच्या चलनी नोटा चलनात काढून
टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी झालेल्या निर्णयानुसार 500 आणि 1000
रुपयांच्या चलनी नोटांचाही समावेश आहे.
काळा पैसा आणि नकली नोटांना प्रतिबंध
करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 31 मार्च 2014 नंतर, 2005
सालापूर्वीच्या सर्व चलनात असलेल्या नोटा चलनातून
काढणार आहे. त्यामुळं 1 एप्रिल 2014 पासून
लोकांनी 2005 पूर्वीच्या सर्व नोटा बँकांमधून बदलून
घ्याव्यात असं आवाहन रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलं
आहे. यासंबंधीचं पत्रक आरबीएनं नुकतेच जारी केलं आहे.
2005 पासून रिझर्व्ह बँकेनं चलनी नोटांवर
निर्मिती वर्ष टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळं
2005 पूर्वीच्या नोटांवर वर्षच नसल्यानं
या नोटा सहज ओळखला येतील.
कुठल्याही नोटाच्या खालच्या बाजूस छपाईचे वर्ष
छापण्यात आलं आहे. त्यामुळं वर्षाचा उल्लेख
नसलेल्या सर्व नोटा बदलून घेण्याचं आवाहन आरबीआयनं
केलं आहे.
लोकांनी गडबडून न जाता या प्रक्रियेत सहकार्य
करावं असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. जू्न्या नोटा वैध
असल्या कारणानं 1 एप्रिलनंतर या नोटा बदलून
देण्याची सुविधा बँकांमध्ये उपलब्ध असणार आहे.
500 रुपये आणि 1000 रुपये मुल्यांच्या दहा पेक्षा अधिक
नोटा बदलून घेण्यासाठी त्यांना आपलं ओळखपत्र
आणि निवासाचा पुरावा बँकेला सादर
करावा लागणार आहे. आरबीआयकडून छापण्यात
आलेल्या नव्या चलनी नोटांमध्ये सुरक्षात्मक दृष्टीनं
अधिक काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळं बनावट
नोटांचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.
रिझर्व्ह बँकेनं 2005 पूर्वीच्या चलनातील नोटा परत
घेण्यासंदर्भात कोणतेही ठोस कारण दिलेलं नाही.
तरी, दडवलेला काळा पैसा शोधण्यासाठीच
आरबीआयनं हा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे.

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .