मजुरी
मुलगा : आई मी आज तुला किराणा आणून दिला, त्याची मजुरी 10 रुपये. भाजी आणून दिली त्याचे 5 रुपये. मेडिकलमधून औषधे आणून दिली त्याचे 8 रुपये. तुझे पाय चेपून दिले त्याचे 15 रुपये. बाबांचे बुट पुसून दिले त्याचे 3 रुपये. एकूण झाले 41 रुपये दे.
( आई 41 रुपये देते.
मुलगा खुप खुश होतो)
सकाळी मुलगा उठतो तेव्हा त्याला उशी जवळ एक लिहिलेला कागद दिसतो. ते वाचताना त्याच्या डोळ्यात अश्रु दाटतात. काय होतं त्यात लिहिलेलं ते पहा.
तुला 9 महिने पोटात वाढवले
त्याचे भाडे काहीनाही
तुला जन्म देताना ज्या कळा सोसल्या त्याचे काहीनाही
तुला दिवसरात्र अंगावर खेळवले त्याचे काहीनाही
तु रात्ररात्र रडायचा आणि कधी मी तर कधी बाबा तुला कडेवर घेऊन अंगाई म्हणत झोपवायचे त्याचे काहीनाही
तु चड्डीतच शु व शी करायचास ते आम्ही आनंदाने साफ करायचो त्याचे काहीनाही
तुला देवीची लस टोचली तेव्हा तुझ्याबरोबर मीही रडले त्याचे काहीनाही
तुला रोज जेवायला देताना तु इकडेतिकडे पळायचास व मी तुझ्या मागेमागे पळत येऊन घास भरवायची त्याचे काहीनाही
तुझा भाऊ तुला घराबाहेर फिरवून आणायचा त्याचे काहीनाही
तु पहिल्यांदा जेव्हा शाळेत गेलास ना बाळा मी तुझी शाळा सुटेपर्यंत रडत बाहेर वाट पहात बसलेले त्याचे काहीनाही
तु एकदा खुप आजारी पडलेलास तेव्हा बाबांनी धावपळ करुन गाडी आणली आणि तुला डाॅक्टरकडे नेले व तुझी औषधे आणली त्याचे काहीनाही
तु शाळेत शिकताना बाबा खुप कष्ट करुन तुझी वह्यापुस्तके दफ्तर व लेखणी आणायचे. ते आणल्यावर त्यांचा चेहरा समाधानी असायचा त्याचे काहीनाही
आयुष्यभर परतपरत वापरत 2/4 कपडेच होते बाबांचे पण तुझी शाळेची फी नाही थकवली त्याचे काहीनाही
मला भाऊबीजेला मिळालेल्या पैशातुन तुला पहिली सायकल घेतली ना त्याचे काहीनाही
मुला, हिशोब करायचा झाला पैशात नको करुस. पैसे माणसाला जनावर करुन सोडते पण जनावरे पैसे न कमावतासुध्दा आनंदी जीवन जगतात.
प्रेमाच्या आड पैसा येतो. पैशा आड प्रेम करायला शिकू नकोस.
आणि हो तुला सांगायचे राहीलेच
आईचे उपकार फेडायचा अजुन जन्माला यायचा आहे
मी जरी आई असले, मलाही एक आई आहे. मी तिचे संतान असले, मलाही एक संतान आहे.
बाळा जगात पैसे मोठे नसतात तर नाती मोठी असतात.
खोटं वाटत असेल तर अनाथ आश्रमातील मुलांना जाऊन विचार
तुझ्या परिवाराच्या चौकौनी फ्रेम मधून कोणीही एकजण बाजूला काढून पहा
जीवन एकतर भकास तरी होईल किंवा उदास तरी होईल.
मुलाच्या डोळ्यातील अश्रुंनी आईचे पाय भिजले होते.
🙏🏻
Comments
Post a Comment