देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे..===

देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे..=========(लेख मोठा आहे नक्कीच वाचा हो.....)
*-*-*-*-*-
         दिनकरराव जवळकरांच्या अत्यंत गाजलेल्या “देशाचे दुश्मन” या १९२५ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकानंतर दुसऱ्याच वर्षी १९२६ मध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचे “देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे” हे घणाघाती पुस्तक प्रकाशित झाले. प्रबोधनकरांनी या पुस्तकात देवळाचा उगमाचा सविस्तर सांस्कृतिक आलेख मांडला आहे. प्रारंभी सर्व देवळे ब्राम्हणांच्या ताब्यात होती जाण्यापूर्वी बहुजनांच्या ज्ञानाची व माहितीची, संपर्काची केंद्रे होती.  आणि या केंद्रावरच त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक ताबा कसा मिळविला हे प्रबोधनकारांनी पुढीलप्रमाणे सांगितले आहे, ते आपण पाहू. 

भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवांच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमी आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवांचे जे आलं वसतिस्थान- ते देवालय आमचे तत्वज्ञान पहावे तो चारचार व्यापुनी आणखी वर दंशामुळे उरला. अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरुरचं काय पडाली होती! बोरीबंदर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहात किंवा ताजमहालात जाण्याचा जसा प्रसंग येतो, तसा चराचरात व्यापुनी दंशामुळे उरलेल्या देवाला सारे जग ओसाड टाकून हिंदूंच्या देवळातच येऊन ठाणे देण्याचा असा कोणता पांग ओढवला होता नकळे. बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून परंगंदा होईपर्यंत म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातान्हात धडपडत पडले तरी कोठे होते? विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्शे धरली, तर इतकी वर्षे आमचे मोक्षदाते देव देवाळाशिवाय जगले तरी कसे कोठे? आजचा त्यांचा देवळातला थाट पहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण या देवांना सकाळची न्याहारी, दुपारी पंचपक्वानांचे भरगच्च ताट, पुन्हा तीन प्रहरी टिफिन आणि रात्री  जेवण! याशिवाय दिवस सुना जायचा नाही. याशिवाय काकड आरत्या, माकड आरत्या, धूप आरत्या, शेजार्त्या आहेतच. कोट्यावधी गोरगरीब जनतेला हिंदुना, विशेषतः धर्मश्रद्धाळू हतभागी अस्पृश्याना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोणपाटाचे ठीगलही मिळण्याची पंचाईत, पण आमच्या देवांना छपरीलंग, मच्छरदाणीशिवाय भागायचे नाही. खुशालचंडू श्रीमंतांप्रमाणे असावी, याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्याचृ आद्य शंकराचार्यानी महारवाडे, धेडवडे व भंगावडे निर्माण करून ठेवले असावेत काय? आमची खात्री आहे कि देवळे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नशिबी महारा मांगाप्रमाणेच............लागलेली असावी. या राहणीतून आपला उद्धार व्हावा. आणि काकड-माकड आरत्यांचे आणि घंटानागर्याचे ऐश्वर्य आपणास लाभावे, म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली, तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीने त्यांना तुरुंग वजा देवळातली भटमान्य राजविलासी राहणी लाभली.

देवळे आणि देव यांची आज कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी, या दोन संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या, याची रुपरेषा वाचकांपुढे ठेवणे जरूर आहे यासाठी आर्यसंस्कृतीच्या जोडीनेच इजिप्त आणि मेसोपोयेटेमियाकडे परिणत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्र्कुतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपाने समालोचन केला पाहिजे. आर्याप्रमाणेच सेमेटिक लोक गुरेढोरे पळून आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी वसाहत करणारे धाडसी भटके होते. तथापि आर्य झाले. काय सेमेटिक झाले काय. “धर्म” शब्द उच्चारताच आज आपल्या ज्या काही भावना होतात, त्या भावनांचा त्यावेळी दोघानाही काही थांग पत्ता लागलेला नव्हता. आर्यांनी पंजाब सर केल्यानंतर अनेक शतके त्यांच्या धर्मकल्पनेत देवळे घुसली नव्हती. त्यांच्या संघ व्यवस्थेत क्षत्रियांच्या पाठोपाठ उपाध्यायांचा भिक्षुक भटांचा वर्ग जरी निर्माण झाला होता, तरी देवळांची कल्पना कोणालाच स्फुरण पावलेली नव्हती. या बाबतीत इजिप्तकडच्या सेमेटिक व सुमेरियन संघानीच प्रथमतः पुढाकारा घेतल्याचे इतिहासावरून दिसते. इजिप्त आणि मेसोपोटेमियंत शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली. त्याचवेळी प्रत्येक शहरात एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झालेला आढळतो. ही देवळे सामान्यतः राजवाड्यानजीकचं असत. मात्र देवळांचा घुमत राजवाड्यांच्या घुमटापेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे. देवळांचा हा प्रघात फिनिशियन, ग्रीक व रोमन शहरांतही पुढे पसरत गेला. इजिप्त सुमेरप्रमाणेचं आफ्रिका, युरोप आणि आशियाच्या पश्चिम भागांकडे जेथे जेथ प्राचीन संस्कृतीचे पूल पडत गेले, तेथे तेथे देवळांची उत्पत्ती प्रथमतः ठळकपणे इतिहासांत दृष्टीस पडते. अखिल मानवांच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासात देवळांची कल्पना ही अशीच प्रथमच जन्माला आलेली आहे.

या सर्व देवळात आतल्या, बाजूस एक देवघर किंवा घाभारा आसे. ह्यात पशु व अर्धमानव अशा स्वरुपाची एक अक्राळ विक्राळ अगडबंब अमुर्ती बसवलेली असे. त्यांच्या पुढे एक यद्य्नकुंड असुन देवाळा दयावयाच्या बळींची त्यांवर कांदुरी होत असे. हे मूर्ती म्हणजे देव किंवा देऊळ म्हणजे या देवाचे वसतिस्थान म्हणून मानण्यात येत असे. देऊळ नव्हते तोपर्यंत देव नव्हता, अर्थात त्यांच्या सेवेकऱ्याचीही गरज नव्हती व उत्पत्तीही नव्हती. पण देवळांत देव येऊन बसल्यावर त्यांच्या पूजे आर्चेसाठी शेकडो भट आणि भटणी, तेलबत्तीवाले , झाडूवाले, कंदुरीवाले, धुपार्ती असे अनेक लोक निर्माण झाले. प्रत्येक जणाचा पेहराव निराळा. लोकातले शिष्ट लोकमान्य काय ते हे हे, आर्याप्रमाणेच, जो क्षत्रिय तोच ब्राह्मण, तोच गृहपती यजमान, वेळ अप्डेल तसे काम करणारा, ही पद्धत या लोकांत नव्हती, त्यांनी आपल्याला एक निराळाच ठराविक व्यवसायांचा संघ बनविला भट म्हणजे भट, मग तो कंदुरी करायचा नाही. कंदुरीवाला निराला सारांश, प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातचं बनविली, आणि बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळांच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यात धुसले.

भटांचे काम दगडया देवाची पूजा आणि याद्ण्यातल्या कंदुऱ्या यथासांग करावयाच्या, हे यज्ञयाग दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हावयाचे, लोकांची भटकी वसाहत-प्रवृत्ती आता बरीच शिथिल होऊन, त्यांना शहरवासियांची चातक लागत चालली होती. सहा दिवस काबाडकष्ट केल्यावर सातवा दिवस विश्रांतीचा असावा, त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सन मानावे, अशी प्रवृत्ती होत गेली, आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस सण मानावे, अशी प्रवृत्ती होत गेली. आणि हे विश्रांतीचे किंवा सणांचे दिवस कोणते हे ठरविण्याचा मामला देवळांतल्या भटोबांकडे असे. तिथवर, सण, खडकाष्ट, फडाकष्ट इत्यादी भानगडी देवळांमधूनच लोकांना काळात असल्यामुळे देऊळ म्हणजे चालते बोलते केलेंडर उर्फ पंचांगचं म्हणाले तरी चालेल.

पण आणखी ही बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळांत घडत असत. लिहिण्याची कला याच वेळी अस्तित्वात आली होती. त्यामुळे शहरांतली व खेड्यापाड्यातली हर एक गोष्ट समारंभ किंवा बरावाईट प्रसंग देवळातच टिपून ठेवण्यात येत असे. देऊळ म्हणजे सार्वजनिक रिकार्ड हाफिस. ज्ञानभांडारही येथेच सणावारीचं लोकांच्या टोळ्यांच्या टोळ्या देवळांत जात असत अस नव्हे, तर वाटेल त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामसाठी तेथे एकेकटाही जात असे. त्या काळात भटजी वैद्यकी आणि छान्छुही करीत असत. त्याची प्रवृत्तीही परोपकारी असे त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायघरच वाटे, काटा रुतला जा देवळात, नवरा रुसला जा देवळात, बायको  पळाली जा देवळात, दुखण्यातून उठला, जा नवस घेऊन देवळात, अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत. बऱ्यासाठी देऊळ वाईटासाठीही देऊळचं, असा प्रकार होता. राजाच्या राज्याभिषेकापासून तो नाठाळ नवतीच्या नाऱ्याचे नाल्यावर नकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भानगडी देवळातच होऊ लागल्या.

आर्य संस्कृतीच्या पगडा बसलेल्या हिंदुस्थानात, इसवी  सणाचा उदय होईपर्यंत, धार्मिक क्षेत्रात नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांतीची वादळे अखंड चालू होती. आपमतलबी भिक्षुककानेही नवमतवाद्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एक सारखाच सुरु ठेविला होता. सापडेल त्या पशूचा यज्ञ, समोरस प्राशन, गोमांस भक्षण येथपासून ऋग्वेदी आर्यांच्या आचार विचारांत क्रांती होत होत बुद्धोत्तर काली बहुतेक हिंदू समाज अहिंसा परमो धर्म वाला निवृत्तीमांस बनला होता. धर्म आणि ईश्वर विषयक कल्पनाही पार उलट्या झालेल्या होत्या. परंतु स्थूल मानाने इसवी सनाच्या २ ऱ्या – ३ ऱ्या शतकापर्यंत हिंदू जनांत व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. जीर्णमताभिमानी व आत्मवर्चस्वभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून, भाती वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या २ ऱ्या व ३ ऱ्या शतकांत महाभारत, रामायणाच्या जुन्या आवृत्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. पण त्या कालच्या कोणत्याही वाद्ग्न्यामयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला, बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या आमदनीपासून बौद्ध भिक्षुच्या योग्क्षेमासाठी आणि स्वध्यायासाठी ठीकठिकाणी मोठेमोठे, विहास, लेणी, गुहा, संघ, मंदिरे ही अस्तित्वात आलेली होती. पुढे पुढे या संघ मंदिरात महात्मा बुद्धांच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धांच्या हीनयान विहारातच बिनचूक पंथाने सुरु केल्या. नंतर इसवी सनाच्या ७-८ च्या शतकांत भिक्षुशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनात कत्तली करविल्या. त्यांच्या विहाराची नासधूस केली. उरल्यासुरल्या बौद्धांना देशोधडीला लावले. लक्षावधी लोकांना मसणवटीस पार धुडकावले. या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकीही हिरावून घेण्यात आली. अश्या रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाजात अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्याने अस्र्पुश्यता निर्माण केली.
         
ठिकठिकाणच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्धमुर्तीचा  उच्छेद केला. आणि तेथे शंकरांच्या पिंडा थापल्या. कित्येक ठिकाणी तर बौद्धमूर्तीचा थोडाबहुत फरक करून त्यांना शंकमुर्तीचा बाप्तिस्मा दिला. अशा रीतीने बौद्ध विहाराचे रुपांतर शंकराच्या देवळात झाले.  जोपर्यंत चिलीमच नव्हती, तोपर्यंत गांजाची जरूर कोणालाच नव्हती. देवळांच्या चिलमी निघाल्यावर निरनिराळ्या देवांचा गांजा पिकवायला हिंदुच्या तरल कालानेला कसला आयास? शंकराची देवळे निघतात ण निघतात, तोच गणपती सोंड हालवीत,  मारुती गदा झेलीत, बन्सीधर कृष्ण मुरली मिरवीत एकामागून एक हजर. समाजबहिष्कृत पडल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या लक्षावधी लोकांनीही आपल्या जीवाच्या समाधानार्थ म्हसोबा, खैसोबा, चेंडोबा असे अनेक ओबा देव साध्या दगडांना शेंदूर फासडून निर्माण केले. आद्यशंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुनरुज्जीवन केलेली भिक्षुकही जसजशी थरारू लागली, तसतशी जातिभेदाची आणि देवळांची पैदास डूकरणीच्या अवलादीला बरे म्हणू लागली. हिंदुच्या देवळांची उत्पत्ती ही अशी झालेली आहे.  
अशीच रोज नवी शेकडो देवळे निर्माण होत आहेत. ही सर्व देवळे ही बहुजन समाजाच्या श्रमातून व पैशातून निर्माण होत आहेत, बहुजनांतील शिकलेली माणसे अज्ञान व श्रद्धेपोटी लाखो रुपये मंदिरासाठी खर्च करीत आहे. फुले, शाहू, महाराज, पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा बांधण्याऐवजी देवळे बांधली असती तर बहुजन समाजाची आज काय अवस्था राहिली असती! त्यांना शिक्षण मिळाले असते का?  परंतु दुर्दैवाने या महापुरुषांच्या शाळातून शिकलेली पिढी नवी शाळा बांधण्याऐवजी मंदिराची निर्मिती करीत आहे याला काय म्हणावे?

गावागावात राहायला घरे नाहीत. घरावर कौले नाहीत, परंतु किमान पंचवीस लाखाचे मंदिर प्रत्येक गावात आहे. देशातील सर्व मंदिरे ही बहुजन समाजाने बांधली आहेत. मंदिर बांधले कि भट येतो व त्या मंदिराचा ताबा घेतो. प्रबोधनकार म्हणतात, “ देवाच्या मूर्तीसाठी आणि देवळांच्या किर्तीसाठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासात कोण दाखवून देईल.” राममंदिराच्या आंदोलनात ६७००० बहुजन युवक मारले गेले. १५ मे २००३ रोजी गोपाल बडवा हा ब्राम्हण पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तीर्थकुंडात मुताल. बहुजानातून काहीही प्रतिक्रिया आली नाही. ब्राम्हण बहुजनांच्या देवावर मुततो व त्याचे मूत्र तीर्थ म्हणून आजही धर्माच्या नावावर बहुजनांस पाजतो. पंढरपुरातून या सर्व बडव्यांना बाहेर हाकलणे गरजेचे आहे. हे प्रत्येक वारकऱ्याचे कर्तव्य आहे. बौद्धकाळात ही देवळे सर्व विहारे होती. तिथे ज्ञानदानाचे पवित्र काम चाले. त्यानंतर पुष्यमित्र शुंग यांच्या प्रतीक्रनातीवर मानुसंस्कृती लादली गेली. आणि यासाठी ब्राम्हणांचे नेतृत्व शंकराचार्यांनी केली. आजचे राममंदिरही पहिले बौद्ध विहारच होते. तसाच नालंदा, तक्षशिला यावर सुद्धा ताबा मिळविला. मुस्लिमांनी हिंदूची देवळे फोडली, मूर्ती फोडली असा हा समाज प्रचार करत आला. महंमद गजनीने सोमनाथाचे मंदिर लुटले. याला कारण तेथील संपत्ती होय. आजही तिरुपती, सत्यसाईबाबा, सिद्धिविनायक व इतर अनेक मंदिरात करोडोंची संपत्ती जमा आहे.
याच्याही पुढे जाऊन संशोधक शिवश्री हरि नरके यांच्या मतानुसार सध्या भारतात ५ लाख ७६ हजार मंदिरे आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न १० लाख १ हजार कोटी रुपये आहे. तर भरात सरकारचे राष्ट्रीय उत्पन्न ४ लाख ५४ हजार कोटी रुपये आहे. भारत सरकारच्या वार्षिक उत्पन्नाच्या दुपात्तीपेक्षा जास्त मिळकत मंदिरात आहे. महाराष्ट्र सरकारचे वार्षिक उत्पन्न ३४ हजार कोटी रुपये तर महाराष्ट्रातल्या मंदिरांचे वार्षिक उत्पन्न ४० हजार कोटी रुपये असे आहे. तर हा सर्व पैसा जातो कुठे याचा बहुजन समाज विचारात करत नाही आणि विचारातही नाही. हा मंदिरात जमा होणारा सर्व पैसा हा बहुजन समजाचा आहे. परंतु हा सर्व पैसा ब्राम्हणांना मिळतो. बहुजनाच्या विरोधात काम करणाऱ्या ब्राम्हणी संस्था या पैशावरच चालतात. आम्ही आमचाच नाश करून घेण्यासाठी मंदिराच्या माध्यमातून ब्राम्हणांना रसद पुरवीत असतो.

      डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांणी १९३२ साली मध्यप्रांतात वऱ्हाडच्या कायदे कौन्सिल्समोर “हिंदू देवस्थान संपत्ती बील” आणले होते. समाजाचे परिवर्तन शासकीय कायद्याच्या मदतीने करण्याचा भाऊसाहेबांचा मानस होता. ह्या गोष्टीला ही त्यांनी विरोध केला तो फक्त आपली पोटे भरण्यासाठीच पण बहुजनांचे लक्ष तिकडे गेलेच नाही. वरती भाऊसाहेबांवरच टीका केली गेली.

सध्या सरकार याकडे जास्तच लक्ष देऊ लागले आहे. कुंभमेळा व इतर धार्मिक कार्यक्रमावर सरकार करोडो रुपये खर्च करत आहे. बुवा-बापू टीव्ही वर ऑनलाईन अध्यात्म पाजत आहे. प्रबोधनकारांनी तेव्हा सुचविलेल्या या पुस्तिकेतील उपायाचा जरूर विचार होण्याची गरज आहे. टे म्हणतात, “ देवळात कोणी तरी दगड्या देव बसला म्हणून देवामुळे भट आणि भटामुळे देवळे”. असे त्यांचे मत आहे. आज आपल्याला शेतकरी मारताना दिसतोय आणि त्याच्यावर राजकारण करून राजकारणी ही जगताना दिसतोय. एका बाजूला अनेक राजकारणी हे देवळांवर पैसा हुदळताना दिसत आहे सानी त्याला सरकार ही तेवढीच मदत करत आहे. आणि यात शेतकरी, सर्वसामान्य मरत जात आहे. असे म्हणायला काही हरकत नाही.

या पुस्तकाचे वाचन सर्वानी करावे आणि देवळांची खरी उत्पत्ती कशी झाली हे समजून घ्यावे असे मला वाटते. माझा लिखाणाचा उद्देश एवढाचं कि खरा इतिहास समोर यावा. वाचून योग्य अशी आणि अभ्यासात्मक प्रतिक्रिया द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.
संदर्भ: देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे.
प्रसाद सुरेश पाष्टे.
एम. ए. भाग १
मुंबई विद्यापीठ
८८८८९१०९९८.

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .