๐ เคเคฒเคฐ्เคी เคเคฃि เคเคฒเคฐ्เคी เคे เคช्เคฐเคाเคฐ๐๐
💐 एलर्जी आणि एलर्जी चे प्रकार💐💐
कुठल्याही बाह्यघटकांच्या विरुद्ध शरीरातील संरक्षण संस्थेने दिलेली तीव्र स्वरूपातील प्रतिक्रिया म्हणजे एलर्जी(Allergy )
होय ....
एलर्जी अनेक करणामुळे अथवा घटकांमुळे होऊ शकते
परागकण , धूलिकण , अन्नपदार्थ , कीटकांचा चावा ,औषधे,
बुरशीचे बीजाणु इत्यादी मुळे एलर्जी होऊ शकते....
एलर्जी चे लक्षणे काहीवेळा अगदी सौम्य स्वरूपाची असतात तर काही वेळेस अगदी तीव्र स्वरूपाची असतात ज्याची परिणीति काही वेळा अतिशय घातक रुपात अथवा
मृत्युमधे परावर्तित होऊ शकते
सर्वसमान्यपने एलर्जी चे काही ठराविक प्रकार दिसून येतात हे प्रकार आणि त्यामागची कारणे खालील प्रमाणे
1) फिव्हर } :-–------
एलर्जी चा हा प्रकार परागकण अथवा इतर सूक्ष्म घटकांमुळे दिसून येतो या प्रकारात
सर्दी,,,, खाज सुटने आणि डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे सुद्धा दिसतात तसेच नाकाजवळील भागात जळजळ होणे , खाजणे किवा म्यूकस अधिक प्रमाणात तैयार होणे आशीही लक्षणे दिसून येतात अधिक सवेंदनशील व्यक्ति असेल तर त्वचेवर चट्टेही उठु शकतात
2 ) रॅश } :–-------------
रॅश अर्थातच काहीवेळा गडद लाल रंगाचे चट्टे पडतात , किंवा तेवढा भाग फुगल्यासारखा होतो विषाणुजन्य
एलर्जी मुळे ताण ताणावामुळे , सूर्य किरणे किवा तापमानातील बदलामुळे त्वचेवर रॅश येऊ शकतात
3 ) वनस्पतिची एलर्जी :---------------
पॉयझन आयव्ही , पोयझन् ओक ,
पॉयझन सुमॅक या झाडांमधे उरुशिओल नावाचा तेलकट रस असतो , या रसामुळे बऱ्याच जनानां एलर्जीक रिऐक्शन येते ,
हा रस त्वचेच्या संपर्कात आल्यास रॅश येऊन खाज सुटते,
ही रॅश काही तासात येते आणि काही दिवस राहते
बागकामाचे साहित्य किवा अन्य कुठल्याही करणामुळे व्यक्ति
याच्या संपर्कात आल्यास त्यास याचा त्रास होऊ शकतो
4 ) किटकांचा चावा :----------------
मधमाशी , गांधीलमाशी , कुंभारमाशी ,
मुंग्या यासारखे कीटक आणि त्यांचा चावा यामुळे अनेकांना
एलर्जी येऊ शकते . या किटकांनी चावा घेतल्यास त्यांच्या नांगी द्वारे विशिष्ट रस त्वचेवर सोडला जातो त्यामुळे याठिकाणी कहिवेळा अल्प वेदना , सूज , लाली वैगेरे येऊ शकते
5 ) पेट एलर्जी :---------------
काही व्यक्तिना पाळीव प्राण्यापासून एलर्जी चा
त्रास होतो , एखाद्या व्यक्तीची शारीरिक सः रक्षण संस्था प्राण्या मधील ठराविक प्रथिनाप्रति तीव्र प्रतिक्रिया दाखवते तेव्हा आशा प्रकारची एलर्जी होते . यामुळे नाकाच्या भागात तीव्र खाज सुटते , शिंका येतात , नाक वाहते आणि इतरही लक्षणे दिसतात .
6 ) लैटेक्स एलर्जी : ---------------
रबर मधील प्रोटीन मुळे काही व्यक्तिना एलर्जी येते , यामधे सर्दीपासून ते तीव्र प्रकारच्या एलर्जी पर्यंत
वेगवेगळे प्रकार दिसतात , कहिवेळा परिस्थिति गंभीर होते तेव्हा लगेच वैदकीय सेवेची गरज भासते
पातळ अथवा जास्त ताणले जाणारे रबर म्हणजे फुगे , हाथमोजे यातील रबर मधे प्रोटीन जास्त प्रमाणात असते त्यामुळे काहिना एलर्जी चा त्रास संभवतो
7 ) बुरशीची एलर्जी :--------------
यामधे प्रामुख्याने इनडोर अणि आउटडोर अशा बुरशी च्या स्पेसीज असतात
अन्ना वरची बुरशी यासाठी कारणीभूत असते ,
बुरशी चे बिजकण स्वसनामार्फत शरीरात गेल्यास काही
व्यक्तिंच्या सः रक्षण संस्थेद्वारे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होते
याचा परिणाम म्हणून कफ होने , डोळ्याना खाज सुटने , यासारखी लक्षणे दिसतात ,
काही व्यक्तिंच्या बाबतीत अस्थमा देखील अशप्रकारच्या
एलर्जी चा परिणाम म्हणून दिसू शकतो
8 ) सौन्दर्यप्रसाधनांची एलर्जी : ------------------
मॉइश्च्चराइजर , शेम्पो , डिओड्रेंट , मेकअपचे साहित्य , कोलेजेन्स , आणि इतर सौन्दर्य प्रसाधने आपल्या दैनदिनीचा भाग असतात बरेचडीदा अशी प्रसाधने एलर्जीक
रिएक्शन ला कारणीभूत ठरतात
प्रसाधनामधे वापरन्यात येणारा वेग वेगळ्या प्रकारचे सुगंध ,
प्रीझर्वेटिव्हज , हे एलर्जीक रिएक्शन वाढवणाऱ्या एजेंट सारखे काम करतात
9 ) औषधानची एलर्जी : -------------
औषधानच्या एलर्जी मुळे एकाच वेळी
वेग वेगळ्या प्रकारची लक्षणे दिसतात , एखाद्या औषध विरुद्ध एलर्जी दीसणे ही तशी सर्व सामान्य गोष्ट आहे
मात्र या रिएक्शन च्या स्वरुपात वेग वेगळे प्रकार दिसून येतात
सौम्य खाज सुटने , किवा सौम्य साइड इफेक्ट्स म्हणजे उल्टया होने किवा अन्नावरिल वासना उड़ने याचबरोबर
तीव्र एलर्जी देखील यात दिसून येते
बऱ्याच औषधंमुळे अंगावर बारीक़ बारीक़ पुरळ उठतात
10 ) सिलम सिकनेस : --------------
हा औषधे घेतल्या नंतर काही दिवसांनी
दिसणारा एलर्जी चा प्रकार आहे
कही वेळा अशाप्रकारची एलर्जी एका आठवडा नंतर येते
एखादी लस दिल्यानंतर अशाप्रकारची एलर्जी दिसू शकते
सल्फा ड्रग्स , आकडी साठी येणारी औषधे , इन्सुलिन ,
आयोडिनेटेड एक्स रे कॉन्ट्रास्ट डाइज इत्यादि औषधामुळे
येणाऱ्या एलर्जी साठी कारणीभूत असणारे घटक आहेत
11 ) एक्झिमा : --------------
हा त्वचेवर खाज निर्माण करणारा एलर्जी चा एक प्रकार आहे लहान मुले , नवजात बालक , आणि काही व्यक्तिना आयुष्यभर या त्रासाला सामोरे जावे लागते अनेक प्रकारचे दाह व्यक्त करणारा आजार याला डर्मीटांयटिस देखील म्हणतात ,
सः रक्षण संस्थेचे अनैसर्गिक कार्य हे या एलर्जी छे कारन मानले जाते
एक्झिमा होण्यामागे त्वचेच्या संपर्कात् येणारे काही सर्व सामान्य घटक म्हणजे
साबन , प्रसाधाने , कपडे , डिटर्जेंट , दागिने आणि घाम
12 ) डोळ्यांची एलर्जी : -------------
ही एकसर्व सामान्य तकरार आहे ,
यामुळे डोळे येणे , डोळ्यात घान येणे , खाज सूटणे
यासारखी सर्व सामान्य लक्षणे दिसतात
परागकण , गवत , धूळ , पाळीव् प्राण्यांच्या अंगावर असणारे सूक्ष्म कण यामुळे ही एलर्जी होऊ शकते
13 ) दुधाची एलर्जी : ------------
दूध आणि दुधाची उत्पादने तसेच दुधातिल काही प्रथिने काही व्यक्तिस एलर्जी स कारणीभूत ठरू शकतात अशा व्यक्तिना
उल्ट्या होने , जुलाब होने , पोटात मुरड़ मारने , अशी लक्षणे
दूध किवा दुग्धजन्य पदार्थ सेवनाने लगेच दिसतात
14 ) अन्न पदार्थाची एलर्जी :-------------
काही व्यक्तिना ठराविक अन्नपदार्थाची एलर्जी असते यामधे अंडी , दूध , पिनट्स , समुद्री पाणी , गहु या सारख्या व् इतर काही पदार्थांचा समावेश होतो
याप्रकारच्या एलर्जी मुळे एलर्जी निर्माण करणाऱ्या
इम्यूनोग्लॉबिन ऐंटीबॉडीज तैयार होतात
अन्ना ची खरच एलर्जी असेल तर सः रक्षण संस्था ऐंटीबॉडी आणि हिस्टामाइन अर्थात रक्त पेशींशी सम्बंदित असणारे द्रव तैयार करतात
Comments
Post a Comment