आजचा बाबा मात्र favourite झालाय ....
आजकाल generation gap जरा कमी झालाय
कालचे अहो बाबा आजचा अरे बाबा झालाय ...
कालचे बाबा रागावणारे guardian असायचे
आज काल समजावणारा friend झालाय
बाबा काल घरातला पोलीस असायचे
आज partner इन crime झालाय
कालचे बाबा शाळेत यायचे तर धडकी भरायची
आज स्कूल मध्ये जाताना hi फाईव्ह देताय
कालचे बाबा हळदीच्या दुधासाठी रागवायचे
आजचा बाबा कोल्ड ड्रिंक share करता झालाय
आजारी मुलीसाठी काल पण बाबा ३ वेळा फोन करायचेच
आजचा बाबा मीटिंग्स cancel करायला शिकलाय
कालचे बाबा मुलाच्या लग्नानंतर देव दर्शनाची तयारी करायचे
आज बाबाने मुलासाठी हनिमून package बुक केलाय
काळ बदलतोच पण नातं नाही बदलत
बाबांच्या कठोर वागण्यात काल पण प्रेम दिसायचं
आजचा बाबाही नकळतच जरा जास्त हळवा झालाय
बाबा कालही हिरो होते आजही आहेच
कालपण बाबा great च होते
आजचा बाबा मात्र favourite झालाय ....
Comments
Post a Comment