नात वडील आणि मुलगी..

अक्षरशः रडायला लावणारी
🙏काळजाचा तुकडा🙏

लाडात वाढलेली लेक
मांडवात उभी पाहुन
हसऱ्या चेहऱ्याने बाप
मुसमुसत होता राहुन राहुन // धृ//

कोपऱ्यात उभा बाप
अक्षता टाकत होता
घाम पुसायच्या निमित्ताने
डोळे पुसत होता //1//

काळजाच्या तुकड्याला पाहुन
आतुन तुटत होता
"पोरीचं चांगलं झालं "
हसुन म्हणत होता //2//

अश्रुंचा बांध त्यानं
अडवुन धरला होता
डोळयासमोरुन लेकिचा चेहरा
दुर होत नव्हता //3//

लग्न लागल्यावर सारेच
टाळ्या वाजवत होते
एक तोच मात्र
आसवांमध्ये भिजत होता //4//

लहानमोठ्यांना तो
हात जोडत होत
"लेकिला जीव लावा माझ्या "
डोळे भरून सांगत होता //5//

सायंकाळी सारे पाहुणे
खिचडीभात खात होते
बापाचा हात न वाजणाऱ्या
फोनकडे जात होता //6//

लेकिचा फोन येताच
"मिरची तिखट आहे" म्हणत
तांब्यानं पाणी पित होता
अन डोळयातलं आसव मागं सारत होता....

सुगी संपल्यावर पाखरांसारखा
एकेक पाहुणा परतत होता
शेवटच्या पाहुण्याला पोहचवुन
"मला भुक नाही" असं
बाप म्हणत होता //8//

बेडरूममधील लेकीचं कपाट
हळुच बाप उघडत होता
तिने ठेवलेल्या कपड्यांवरून
थरथरता हात फिरवत होता //9//

तिथच बेडवर बसुन
ओंजळीत तोंड धरून बाप
आवाज न करणाऱ्या
धबधब्यासारखा फुटत होता//10//

मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको
"आई" होत होती
वय वाढलेल्या सशाला
छातीशी घट्ट धरून
काळजाच्या तुकड्याला आठवुन
आसवांमध्ये भिजत होती//11//

हे अस नात वडील आणि मुलगी..
म्हणून म्हणतो एक तरी लेक असावी.
डोळ्यातील प्रत्येक थेंबात दिसणारी..
✍🏻✍🏻✍🏻

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story