आई घर बांधायचं, अगं गेलं ना आता राहून..

इच्छा सगळ्या भिजल्या, स्वप्नं गेली वाहून,
आई घर बांधायचं, अगं गेलं ना आता राहून..

आई म्हटली नको जाऊ, पाऊस जरा थांबू दे,
मन माझं मानत नाही रात्र तेवढी जाऊदे..

माफी मागतो आई तुझी मी, हात माझे जोडूनी,
ऐकलं नाही काही तुझं मी, गेलो तुला सोडूनी..

भाऊ माझा भोळा, बॅग माझी देऊन
म्हणला, दादा येताना जीन्स ये घेऊन...

बहीण माझी छोटी, करायचं होतं लगीन,
बोलली रक्षाबंधनाला वाट तुझी बघीन..

बायको सर्व बघत होती, डोळे आले भरून
निघालो घरा बाहेर पोरांना टाटा करून..

काळोख होता भयाण, पाऊस होता बेफाट,
बेल वाजली एस.टी. ची, निघाली मुंबई ची वाट..

काय झालं काय जणू, मन नव्हतं लागत
पुसले माझे डोळे मी, खिडकी बाहेर बघत..

तेवढ्यात भेटला दणका, हाहाकार झाला,
बस झाली पलटी, पाण्याचा लोंढा आत आला..

काय करू कुठे जाऊ ? क्षणात संपलं सारं,
जीव घुटमटला, डोळे फिरले, पाणीच पाणी सारं..

बाहेर पडणं मुश्किल होतं, तडफडलो मी आतच
बंद पडले शरीर माझे, चालले तेवढे हातच..

जमलं तेवढी दिली झुंज मृत्यु च्या देवा शी,
हसत होता, बघत होता, खेळत होता जीवाशी..

प्रयत्न माझे संपले सारे, पाण्यातच मी रडलो,
श्वास कोंडला, जीव तडफडला, मृत्यूशी मी हरलो..

कोणाचं मी काय बिघडवलं, असा कसा मी मेलो
माफ कर मला प्रिये, तुला मी अर्ध्यात सोडून गेलो..

आई तुझी आठवण आली गं गेलो जेंव्हा मी वाहून,
किती मोठं केलंस मला तू स्वतः उपाशी राहून..

बाबा म्हणजे सावली घराची, जसे बहरदार झाड,
ऐकलो नाही मस्ती केली तरी पुरवले लाड..

बायकोने ही रडून रडून अर्धा जीव केला असेल,
पोरं माझी कशी झोपतील, जेंव्हा पप्पा नसेल?

मित्रांच्या ही पार्ट्या आता जरा थांबल्या असतील,
आठवण काढतील माझी कदाचित नाक्यावरती बसतील..

संपली सगळी नाती क्षणार्धात, संपली स्वप्ंन सारी,
इच्छा राहिल्या अपूर्ण माझ्या, संपली दुनियादारी..

रडू नको ना आई, का गं अशी तू करती,
तूच म्हणायचीस मोठा होशील नाव कमावशील येशील टीव्ही वरती..

बघ किती ह्या होड्या अनं हेलिकॉप्टर पण आले,
शोधायला तुझ्या लेकाला, मुख्यमंत्री हजर झाले..

आमदार ही धावून आले पोलिसांची घाई
आता काय उपयोग तुमचा, करुनी कारवाई..

लवकर शोधा भावांनो, आठवण घरची येते,
कधी भेटते आई मला अनं
कधी छाती शी घेते
कधी छाती शी घेते
कधी छाती शी घेते.....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story