संत तुकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेय बघा....*

*संत तुकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेय बघा....*

*घासावा शब्द | तासावा शब्द |*
*तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||*

*शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा*
*बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||*

*बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके |*
*ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे*

*बोलावे बरे | बोलावे खरे |*
*कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||*

*कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |*
*जातपात धर्म | काढूच नये ||*

*थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |*
*मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला*

*शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान , कर्म ,भक्ती |*
*स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||*

*शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |*
*शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||*

*जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |*
*पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये🌹*
   *💐   💐*

बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ! पंढरीनाथ महाराज कि जय !!!! 🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .