पैसा

द.अफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर अर्थिक मंदिची लाट आली होती.

प्रत्येक व्यवसायीकाचा धंदा जेम तेम चालत होता.

आशाच एका लाँजिंग with बोर्डिंग असलेल्या हाँटेल मध्ये बाहेर देशाचा एक व्यापारी आला....

त्याने हाँटेल मँनेजरकडे १००डाँलरची नोट दिली व सांगितले की मला  मुक्कामाला एक छान खोली पाहिजे....

हाँटेल मँनेजरने वेटरला सांगितले की साहेबाना रुम दाखवून आण पसंत पडली तर साहीत्य घेवून जा....

परदेशी पाहूणा रुम बघायला गेला.....

मधल्या वेळेत मँनेजरने १०० डाँलरची नोट घेतली व बेकरी वाल्याचे पैशे चूकते केले....

बेकरीवाल्याचा धंदा जेमतेमच चालत होता .
तो खूश झाला. त्याने त्या १००डाँलर्सची नोट घेतली व किराणा दुकणदाराची उधारी चूकती केली.....

किराणा दुकाणदाराला आनंद झाला.
फार दिवसापासून कामवाल्या बाईचे पैशे देता न आल्यामुळे ती कामावर येत नव्हती....

तो लगेच तिच्याकडे गेला .१०० डाँलर्सची नोट कामवाल्या बाईला दिली व सांगितले की आजपासून रोज कामावर येत जा...

बिचारीचा आनंद गगनात मावेना.फार दिवसापासून तिला काम नव्हते .जवळ पैशे नव्हते...
ती उधार उसनवार करुन कसा तरी संसाराचा गाडा चालवत होती....

१०० डाँलर्स मिळाल्यामुळे तिला आनंद झाला....

ती तात्काळ ते पैसे घेवून हाँटेल मालकाकडे गेली....
जो खूपच चांगला ,दयाळू व मदतगार होता. तिला पैशांची गरज होती तेव्हा त्याने तिला १००डाँलर्स उसनवार दिले होते...

त्या बाईने हाँटेल मालकाचे पैशे परत केले. व आभार मानून निघून गेली.....

तितक्यात त्या परदेशी पाहूण्याला खोली पसंद न पडल्यामुळे तो मँनेजरकडे आला व १००डाँलर्सची नोट घेवून निघून गेला....

अर्ध्या एक तासा साठी १०० डाँलर्स बाजारात चलन रुपाने फिरले.
प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिक पार पाडली...

त्यामुळे हाँटेल मालक ,बेकरीवाला,किराणा दुकाणदार,कामवाली बाई प्रत्येकाचे देणे घेणे फिटले व पुन्हा ते व्यवसाय करु लागले...

आपल्याजवळ जी संपत्ती असते त्या संपत्तीचे आपण मालक नसून विश्वस्त असतो....

प्रत्येकजणांनी कथेतील माणसा प्रमाणे वर्तणूक केली तर विजय मल्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. .....

नेहमी पैसा  फिरता ठेवा.
त्यावर अनेक जणाचे संसार  चालतात. जीवन जगण्यासाठी त्याचा वापर करा,
फक्त त्याच्यासाठी जगू नका.....🙏🏻

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .