!!.. Modern मैत्री ..!!

!!.. Modern मैत्री ..!!

शाळेत होतो एकत्र
Class लावला, झालो मित्र
आयुष्यातील सोबतीचे;
तिथे स्पष्ट झाले चित्र!

गेलो सर्व Hsc ला
वेगळा Group तिथे बनविला
एकत्रच मारायचो Shine;
काहींची त्यात बसली Line!

पाहता बघता College संपले
सर्वांचे मार्ग वेगळे झाले
बसलेल्या Line पण तुटल्या;
पुढील समस्या इथुनच कळल्या!

Weekend ला होऊन एकत्र
मांडताना Life चे चित्र
एकमेकांची प्रकरण सोडविताना;
लोक समजुन गेली, हे खरे मित्र!

पाहता बघता सर्व शिकले
PocketMoney चे दिवस संपले
"जग पैस्यांवर चालते दोस्ता.."
याचे गणित तेव्हा उमगले!

मग काय सर्व Company चे वारकरी बनले
Day असो वा Night,
काम करू लागले!
पैसा खिशात येऊ लागला;
पण वेळ हातात नाही राहिला!

नात्यांची जागा गरजांनी घेतली
गरजा भागवताना सुख हरपली..
सुखाच्या मागे समाधान ही गेले
मैत्री चे दिवस आठवून,
डोळ्यांत पाणी आले!

कुठे तरी परत एकत्र येण्याची गरज वाटली;
सोबतीला Whats app अन FB ची साथ भेटली ..
Group बनविले सर्व जण भेटले;

Virtually आता गप्पा रंगतात;
भेटण्याचे Plan नेहमी फोल ठरतात..
आता सर्व प्रपंचात रममाण झाली;
Social Networking मुळे at Least;
मैत्री तरी टिकुन राहिली!

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story