तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे*

*तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे*
● भाग 1
□हेल्दी स्किन
दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात,त्याच बरोबर त्वचा,चेहरा उजळतो
● भाग-2
□ सांध्यांना आराम
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते,सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
● भाग-3
□ वजन कमी करण्यास सहाय्यभूत
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.
● भाग-4
□ बॅक्टेरिया नष्ट होतात
तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात,या मध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात,आणि डायरिया,अतिसार,कावीळ यांचा धोका टळतो
● भाग-5
□ कॅन्सरचा धोका कमी होतो
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस् पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात,त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
● भाग-6
□ जखम ठिक होते
तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठिक करण्यास मदत करतात,एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे
● भाग-7
□ थायरॉईडचा धोका कमी होतो
तांब्यामधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.
● भाग-8
□ हृदय मजबूत होते
तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते
● भाग-9
□ अँसिडीटी नष्ट होते
तांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठिक राहते.
● भाग-10 शेवटचा
□ रक्त वाढण्यास मदत होते
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते,त्यामुळे अँनिमियाचा धोका टळतो.
आपण माझी
"तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे" हि मालिका मन लावून व वेळ देवून वाचली,याचा कोणाला किती फायदा झाला हे मला माहित नाही,पण आपल्या सारख्या चांगल्या माणसांसाठी चांगले देण्याचा माझा हा छोटासा व प्रामाणिक प्रयत्न होता !!!
धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .