कर्म म्हणजे काय ?

कर्म म्हणजे काय ?
.
.
एकदा एक राजा हत्तीवर बसुन आपल्या राज्यात
निरीक्षण करण्यास फिरत होता.
.
.
.
फिरतफिरत तो
.
.
.
.
एका गावातील दुकानासमोर थांबला. प्रधानाला
बोलाऊन म्हणाला, कां कोण जाणे मी या
दुकानदाराला पूर्वी कधी पाहीले नाही, त्याला
ओळखतपण नाही पण मला या दुकानदाराला फाशी
द्यावे वाटते आहे. प्रधान बुचकळ्यात पडला तो कांही
बोलण्याच्या अगोदरच राजा तेथून पुढे निघाला.
प्रधान विचारात पडला. त्यान तेे दुकान पाहून ठेवले
व तो राजामागे निघाला.
दुस-या दिवशी प्रधान गावातल्या त्या दुकानाशी
साध्या वेशात पोहोचला. दुकानात दुकानदारा
शिवाय कोणीच नव्हते. आजुबाजुला चौकशी करता
तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले. तो
दुकानात गेला. त्याच्याकडे सुवर्णवर्णाचे सुगंधी चंदन
होते. मात्र कोणी खरेदीदार नसल्याने मालक
वैतागला होता. चौकशी करता कळले की लोक नुसते
येतात वास घेतात आणि साधा दरही न विचारता
निघून जातात. रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला
ब-याचवेळा वाटे की किमान राजा तरी मरावा.
तो मेला तर त्या आसमंतात दुसरा कोणी चंदनाचा
व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्य संस्काराला
तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल. माल
विकला जाईल. चार पैसे तरी मिळतील.
प्रधानाला मग राजाला या अनोळखी व्यापा-
याला फाशी कां द्यावे वाटले याचा उलगडा
झाला. व्यापा-याच्या मनातील राजाविषयीच्या
वाईट विचारांच्या तरंगलहरीनी दुषीत वातावरणात
राजा आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला
फाशी देण्याचे विचार उद्भवले होते.
त्याने त्या दुकानदाराकडे थोडी चंदन खरेदी केली.
दुकानदाराला ब-याच दिवसांनी गि-हाईक
मिळाल्याने आनंद झाला. प्रधान निघाला आणि
राज दरबारात राजापुढे ते चंदन ठेवले. राजाने कागद
उघडून चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्ण वर्णाने
आणि सुगंधाने मोहित झाला. त्याने प्रधानाला
विचारले कोठून आणले हे चंदन ? प्रधानाने त्या
व्यापा-याचे नांव सांगितले. राजा म्हणाला, अरे
काल उगाच मला त्याला फाशी द्यावे वाटले ! त्या
व्यापा-याला कांही सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश
दिला. राजा अध्ये मध्ये इतरांना अनमोल भेटी
देण्यास चंदन खरेदी करु लागला. राजाच्या खरेदीने
आनंदित व्यापा-याच्यामनात आता राजा मरावा हे
येईनासे झाले. चांगल्या दर्जाचा चंदन व्यापारी
म्हणून राजाचा तो मित्र झाला.
आपल्या मनात इतरां विषयी चांगले विचार,
दयाळुपणा आणला तर इतरांच्या मनातुनही चांगले
विचार चांगल्या भावना आपल्यापर्यन्त येतील. व
आपला उत्कर्ष होईल.
तेंव्हा स्वामीनी विचारले, मग कर्म म्हणजे काय ?
अनेकजण म्हणाले, आपले शब्द, आपली कृती, आपली
भावना....
मान हलवून स्वामी म्हणाले, आपल्या मनात येणारे
विचार हेच आपले खरे कर्म होय !!!

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story