फाईव्ह पॉइंट समवन

फाईव्ह पॉइंट समवन

 
            ‘इट्स चेतन भगत्स आर्टिकल फॉर इंडियन विमेन...’     
 
'नेल्सन मिडीया रिसर्च या जगद्विख्यात कंपनीच्या जागतिक सर्वेक्षणानुसार भारतीय महिला सर्वाधिक तणावपूर्ण आयुष्य जगतात. त्यातल्या ८७ टक्के महिला पूर्णवेळ तणावाखाली असतात’...
     अमेरिकेतसुध्दा महिलांचं तणावाखाली असण्याचं प्रमाण ५३ टक्के इतकंच आहे’...
                   
       
‘आय वाँट टू गिव्ह इंडियन विमेन फाईव्ह सजेशन्स टू रेड्यूस देअर स्ट्रेस लेव्हल’...

‘तुम्ही अबला आहात असं समजू नका. ते विशेषण ‘सासू’साठी राखून ठेवा. तुम्ही जशा आहात तसंच स्वत:ला जपा. इतरांना वाटतं म्हणून तसं बनण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही इतरांना आवडत नाहीयात का? हा त्यांचा प्रॉब्लेम आहे’
  
‘जर तुम्ही चांगलं काम करत असूनही तुमचा बॉस दखल घेत नसेल तर त्याला तसं जाणवून द्या. तरीही त्याचा अ‍ॅटिट्यूड बदलला नाही तर जॉब बदला. हुशार, मेहनती माणसांना बाहेर खूप मागणी आहे’
    
‘उच्च शिक्षण घ्या, कौशल्य, तंत्रज्ञान आपलंसं करा. ते तुम्हांला आर्थिक पाठबळ देईल. त्यामुळे जर तुमच्या नवऱ्याला तुम्ही ‘योग्य पत्नी, आई किंवा नणंद वाटत नसाल तर ठणकावून सांगा, दुसरी शोध!’
         
‘कायम घर आणि आॅफिस या दुहेरी जबाबदारीच्या तणावाखाली राहू नका. मला माहिताय, हे अशक्य आहे. त्यासाठीची युक्ती अशी आहे की, प्रत्येक फ्रंटवर ‘ए-प्लस’ मिळवण्यासाठी धावायचं नाही. तुम्ही परीक्षा देत नाहीयात हे लक्षात ठेवा आणि सर्वोत्तम ठरण्याचा अट्टाहास सोडून द्या. तुम्ही जेवायला चारच्या ऐवजी दोन पदार्थ बनवलेत तरीही इट्स ओके! कुणाचंही पोट भरायला ते पुरेसे आहेत. प्रमोशनसाठी अहोरात्र काम करायची काहीच गरज नाहीय. कुणालाही मरताना आपलं ‘जॉब डेसिग्नेशन’ आठवत नसतं किंवा कुणी ते सोबतही घेऊन जात नाही. तेव्हा त्याच्यासाठी ‘धावायचं’ थांबा.’
            
‘पाचवं, सगळ्यात महत्वाचं, दुसऱ्या स्त्रियांशी स्पर्धा करणं सोडून द्या. दुसरी कुणीतरी तुमच्यापेक्षा अधिक सुगरण असू शकते, तिसरी कुणी तुमच्या इतक्याच वेळेत तुमच्यापेक्षा जास्त वजन कमी करू शकते, तुमची शेजारीण नवऱ्याला सहा डब्ब्यांचा टिफीनही देऊ शकते... तुम्ही करू नका... ‘डू युवर बेस्ट’ पण ते चांगलं आहे या रिपोर्टकार्डसाठी इतरांकडे अपेक्षेने पाहू नका... प्रत्येकवेळी ‘टॉप आॅफ द क्लास’ असण्याचा अट्टाहास चुकीचा आहे. जगात ‘आयडीयल वुमन’ किंवा ‘सुपरमॉम’ अस्तित्वात नाही... जर तुम्ही हे टायटल मिळवण्यासाठी झगडत असाल तर तुमच्यासाठी एकच गिफ्ट आहे... स्ट्रेस!’
      
‘सो चिल! रिलॅक्स! तुम्ही सुंदर आहात हे स्वत:ला सांगा आणि शांत, सुंदर आयुष्य जगा. प्रत्येकाला खुश करण्यासाठी तुम्ही जगात आलेल्या नाहीयात... तुमच्याकडे ‘उदात्त’ असं आहे ते जगाला देण्यासाठी आणि त्यातून आनंद मिळवण्यासाठी तुमचा जन्म झालाय... आनंदी रहाणं हा तुमचा हक्क आहे... पुढच्या सर्वेक्षणात आपला नंबर सर्वाधिक आनंदी महिलांच्या यादीत असायला हवा...

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .