राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना

🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖
*राज्य शासकीय व जि.प.*
सर्व कर्मच्यांना कळविण्यात येते की, *दि.01/04/2016*रोजी महाराष्ट्र शासनाने “ *राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात  विमा योजना”*  ( शासन निर्णय क्र.201602041630296605 पहा ) सूरू केली आहे.
सन-2016 पासून सदर योजनेची *वार्षिक वर्गणी रू.344 /*- कपात करण्यात आली आहे.(माहे- फेब्रूवारी 2016 च्या पगारतून कपात केली गेली आहे).

        *योजनेची वैशिष्टे –*

*1*.सदर योजना सर्व *राज्य शासकीय कर्मचा-यांना* लागू आहे.

*2*अपघातामूळे मृत्यू आल्यास वारसांना मिळणार *रू.10 लाख* *विमा रक्कम.*

*3*.राज्य शासकीय कर्मचारी *समूह वैयक्तीक अपघात विमा योजना*आणि *राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-1982* या स्वतंत्र असतील.सेवेत असतांना कर्मचा-याचा अपघाताने मृत्यू झाल्यास राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-1982  अंतर्गत देय विमा निधी रकमे व्यतिरिक्त समूह वैयक्तीक अपघात विमा योजनेखालील लाभ देय असेल.

*4.*अपघाती निधन पावलेल्या कर्मचा-याच्या वारसांना संबंधीत कर्मचा-याच्या मृत्यूच्या दिनांकापासून वारसांनी कार्यालय प्रमूखांनी सदर योजनेअंतर्गत विमा दाव्याकरीता *जोडपत्र -3 व खाली नमूद सर्व कागदपत्रांची तातडीने पूर्तता केल्यानंतर समूह अपघात  विमा योजनेच्या लाभाची रक्कम सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून *3 महिन्यांच्या* आत देण्यात येईल.तसेच संबंधीत कर्मचा-याच्या वारसांनी तथा कार्यालय प्रमूखांनी सदर योजनेअंतर्गत विमा दाव्याकरीता जोडपत्र-3 तथा नमूद सर्व कागदपत्रांची तातडीने पूर्तता केल्यानंतरही 3 महिन्यांपेक्षा अधिक विलंब झाल्यास कालावधीकरीता  *भविष्य निर्वाह निधीवरील प्रचलीत व्याज दरानूसार* व्याज देंण्यात येईल.

*5*.सदर *रकमेचे प्रदान कोणत्याही परिस्थितीत रोखण्यात येणार नाहे.जसे-अपघाती मृत्यू समयी कर्मचा-या विरूध्द विभागीय/न्यायीक कार्यवाही प्रलंबित असेल अथवा त्याचेकडून काही शासकीय येणे बाकी असेल.*

*6*.सदर योजनेची प्रदेय रक्कम करण्यास प्रशासकीय चूकीमूळे 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचा विलंब झाल्यास या चूकीस जबाबदार असणा-या कर्मचारी/अधिकारीविरूध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

*7.योजनेचे सदस्यत्व स्वीकारतांना नाम निर्देशन करणे अनिवार्य आहे.त्यामूळे ज्या कर्मचा-यांनी नाम निर्देशन फार्म भरला नसेल त्यांनी तात्काळ भरून द्या..*

*सादर करावयाची कागदपत्रे –*

1.संबंधीत मयत  कर्मचा-याच्या नामनिर्देशित वारसदाराने पूर्ण भरलेला अपघात विमादाव्याचा अर्ज.
2.मृत्यू प्रमाणप्रत्र.
3.पोलीस पंचनामा आवश्यक असल्यास.
4.शवविच्छेदन अहवाल.
B पंचनामा.
🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .