*✍๐Ÿป๐Ÿ–ฅ๐ŸŽž๐Ÿ“ฝ॥ เคœिเคตเคจाเคฎृเคค ॥๐ŸŽฅ๐ŸŽž๐Ÿ–ฅ✍๐Ÿป*

*✍🏻🖥🎞📽॥ जिवनामृत ॥🎥🎞🖥✍🏻*

*जिवनामृत* या सदराखाली आज खास दीवाळी निमित्त *ह्रदयस्पर्षी लेख* लिहित आहे........✍🏻

विषय : *कृतज्ञता............✍🏻*

▫मी आज तुम्हांला चित्रपटातील हिरो व जगावर आधीराज्य करणारा सुपरस्टार, खर्‍या जिवनातही कसा सुपरहिरो आहे ते सांगणार आहे . . .

▫अंदाजे जानेवारी-फेब्रुवारी 1984 सालची हि गोष्ट . . .

▫त्या काळातील नावाजलेले सुपरहीट डायरेक्टर-प्रोड्युसर व निर्देशक प्रकाश मेहरा हे सन 1982 ते 1984 च्या दरम्यान प्रचंड आर्थिक नुकसानीत होते . . .

▫गाडी, बंगला व इतर संपत्ती सर्व गहाण पडले होते . . .

▪राजाचा रंक कसा व कधी होईल हे अनेकांना न समजणारी गोष्ट आहे . . .

▫या वरिल वाक्याप्रमाणेच प्रकाश मेहरा यांचे झाले होते . . .

▫प्रचंड कर्जाच्या ओझ्याने सर्व बाजूने दबाव व मार्केटमधील कमी होत चाललेली पत पाहता प्रकाशजींना जगणे मुश्किल झाले होते . . .

▫परंतू प्रकाश मेहरा हार मानणार्‍यांपैकी नव्हते . . .

▫एक दिवस त्यांना एक पटकथा समोर आली, त्यांना ती खुप आवडलीही, पण या पटकथेला शोभणारा व योग्य न्याय देणारा हिरो असावा तर फक्त अभिताभ बच्चनच . . .

▫असे त्यांना मनोमन वाटले, पण अमिताभ बच्चन तर सुपरस्टार आहे? त्यांच्याकडे अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट आहेत आणि आपल्याला त्यांचे मानधन द्यायला जमेल का?
असे अनेक प्रश्न निर्माण झाले . . .

▫या आधी अमिताभ बच्चन यांना बरोबर घेऊन अनेक चित्रपट केलेले होते. प्रकाश मेहरांनी निर्देशित केलेल्या अनेक चित्रपटांमुळेच अमिताभ हे सुपरस्टार झाले होते. प्रकाश मेहरांनी जंजिर या चित्रपटात प्रथम भुमिका दिली होती व तिथून पुढेच अमिताभजींचे सर्व चित्रपट सुपरहिट होत गेले.
पण या बाबत त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा अहंभाव व अहंकार उफाळून आला नाही.
उलट अमिताभ हा सुपरस्टार आहे म्हणल्यावर आपला चित्रपट साईन करेल का ? या विचारांनी मनात काहुर उठले होते . . .

▫काय करावे ? काय करु नये ? या विचारात आठ दिवस प्रकाश मेहरांचे मन सुन्न झाले होते, पण नंतर विचार केला की आपण एक फोन करुन तर पाहू . . .?

▫मनाची तयारी करुन प्रकाशजींनी अमिताभ बच्चन यांना फोन लावला . . .
फोन PA नी ऊचलला, आणि त्याने बच्चन साहेबांना फिल्म निर्देशक प्रकाश मेहरांचा फोन आहे असे सांगितले . . .

▫बच्चन साहेबांनी फोन घेतला व बोलायला सुरुवात केली . . .

▫समोरुन प्रकाश मेहरा :
"अमिताभजी माझ्याकडे नविन व अर्थपुर्ण स्क्रिप्ट तयार आहे आणि मला वाटते की, यातील मुख्य भुमिकेला फक्त तुम्हीच न्याय देवू शकता . . . !"

▫अमिताभ बच्चन यांनी काहीही उत्तर न देता फोनचा रिसीव्हर ठेवून दिला . . .

▫प्रकाशजी खुप नाराज झाले, त्यांना वाटले की, सुपरस्टार असल्याने बच्चनसाहेब खुप बिझी असणार? अन् आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसणार? म्हणूनच काहीही उत्तर न देता फोन ठेवला असावा . . .?

▪या प्रकाराने प्रकाशजींचे डोकं खुप जड झाले होते, त्यांनी पत्नीला चहा मागितला . . .

▫फोनच्या रिसीव्हरकडे एकटक नजर लावून प्रकाशजी चहा घेत होते . . .

▫अचानक दारावरच्या बेलचा आवाज खणखणला . . .

▫प्रकाशजी स्वत: उठले व दार घडण्यासाठी जड पावलांनी दार उघडण्यासाठी गेले . . .

🤔समोर बघतात तर काय?

▫दरवाज्यात फिल्म इंडस्ट्रीज मधील सुपरस्टार त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्यासह दोघे दांपत्य साक्षात हजर होते . . .

▪प्रकाशजींना प्रचंड आनंद झाला . . .

▪तोंडातुन शब्दही फुटेना . . .

▪आभाळ ठेंगने वाटायला लागले . . .

▪साक्षात परमेश्वरच आपल्या दारात उभे असल्याचा भास झाला . . .

▫प्रकाशजी व त्यांच्या पत्नीने दोघांचे आदराने स्वागत केले . . .

▪पाहुणचाराबरोबर चर्चा चालू झाली . . .

▫प्रकाश मेहरा नविन स्क्रिप्ट सांगू लागले . . .

▫तेवढ्यात अमिताभ बच्चन यांनी त्यांना थांबविले व म्हणाले की, "प्रकाशजी; तुम्हांला स्क्रिप्ट आवडली म्हणल्यावर मला सांगण्याचा प्रश्नच येत नाही . . .!"

"आत्ता लगेच अॅग्रीमेंट करुन घ्या व आज पासून तीन महिन्यात आपला चित्रपट रिलिज झाला पाहिजे अशा तयारीला लागा . . .!"

▫असे बोलून अमिताभ बच्चन यांनी सध्या चालू असणार्‍या चित्रपटांच्या निर्देशकांना लगेच फोन केले व सांगितले की, "मी तीन महिने आपल्या चित्रपटांचे शुटिंगसाठी उपलब्द होऊ शकणार नाही. आपले उर्वरीत शुटिंग तीन महिन्यांनंतरच सुरु होईल . . ."

▫प्रकाशजींनी वकील बोलावून डाॅक्युमेंटची व्यवस्था केली . . .

▪पण अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एक अट घातली . . .

▫अमिताभ बच्चन :
"आपला चित्रपट न थांबता सलग काम करुन चित्रपट तीन महिन्यात पुर्ण करु...!
पण त्यासाठीचे माझे मानधन मी स्वत: ठरविणार . . .
तुम्ही द्याल त्यात माझे समाधान होणार नाही . . .

▫प्रकाश मेहरा हे आधीच आर्थिक अडचणीत ? त्यात ही वेगळीच अट ? काय करावे काही समजेना ?
पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खुप गाजणार व सुपरहिटही होणार याची खात्री असल्याने त्यांनी लगेच हि अट सुध्दा मान्य केली . . .

▫सर्व डाॅक्युमेंट तयार झाले अन् सहीसाठी अमिताभ बच्चन यांच्यापुढे ठेवले . . .

▫अमिताभ बच्चन यांनी अॅग्रीमेंटवर आधी सह्या केल्या व मानधनाच्या जागी स्वत: रक्कम टाकली . . .

▪मित्रांनो; हि रक्कम होती फक्त *एक रुपया* . . .

👉🏻होय, *फक्त एक रुपयाच . . . !*

▪अजब आहे ना ?
👉🏻यालाच तर *कृतज्ञता* म्हणतात . . .

▫ज्या माणसांमुळे आपण सुपरस्टार झालो, तो माणूस आज अडचणीत आहे आणि त्यांना अडचणीतुन बाहेर येण्यासाठी आपली मदत होते म्हणल्यावर निस्वार्थपणे लगेचच पुढे होऊन समोरच्याला सावरण्यासाठी खुप मोठे मन व वाघाचे काळीज लागते . . .

▫प्रकाशजींनी अॅग्रीमेंट वरील रक्कम पाहिली व त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले . . .

▫प्रकाशजींनी उभे राहुन बच्चन साहेबांना मिटी मारली व एकदाचा बांध फुटला . . .

▫साक्षात माणसातला माणूसकी जपणारा भगवंत आज त्यांना सावरायला त्यांच्या घरी, त्यांच्या जवळ हजर होता . . .

▪मित्रांनो; येथे दोन्ही मातब्बर श्रेष्ठ म्हणावे लागतील . . .

▪कारण प्रकाश मेहरांनी जर पुर्वी चांगले काम केले नसते तर हा दिवस उजाडलाच नसता . . .

▫बरोबर तीन महिन्यांनी म्हणजे *18 मे 1984* रोजी संपुर्ण देशभर सर्व चित्रपट गृहांमध्ये हा अनोखा व अायुष्याला कलाटनी देणारा चित्रपट रिलीज झाला आणि सुपर-डुपर हिट ठरला . . .

👉🏻हा अनोखा चित्रपट होता *________शराबी*

▪हाच तो चित्रपट ज्याने प्रकाश मेहरांच्या आयुष्याला नव कलाटनी देवून पुन्हा सोन्याचे दिवस आणले . . .

▫मला माहिती आहे की, मी थोडक्यात वाचलेली वा ऐकलेली हि कथा माझ्या शब्दशैलीत लिहिल्यामुळे एखाद्याला आवडेल किंवा नाही पण आवडणार . . . ?

▫पण मला मात्र *कृतज्ञता* या शब्दाच्या अर्थासाठी अगदी समर्पक वाटली म्हणून अवर्जून लिहिण्याचे धाडस केले आहे . . .

▫आयुष्यात आपणही असेच वागलो तर आपल्याही आयुष्याचे सोनं होईल असे मला मनोमन वाटते . . .

*👉🏻नाहीतरी या जन्मात दुसरे आहेच काय ?*

▫आपल्यामुळे जर एखाद्याचा संसार पुन्हा उभा राहत असेल तर यापेक्षा आपल्या आयुष्यातील पुंण्याचे काम दुसरे असूच शकत नाही . . .

▫म्हणून आपल्या बरोबर असणारांचा नेहमी आदर करा... त्यांना विश्वासाने जिंका, व त्यांनी केलेल्या उपकाराची जाणिव पावलो-पावली ठेवा . . .

▪आज *बलिप्रतिपदा* म्हणजे *दीपावली पाडवा*...

🔅आजच्या या नववर्षाच्या निमित्ताने सर्वांना खर्‍या अर्थाने *कृतज्ञता* या शब्दाची व्याप्ती समजावी व आत्मज्ञानाची प्रचिती होऊन दीवाळीचा हा सण खर्‍या अर्थाने साजरा व्हावा . . .

🔅आज दीवाळी पाडव्या निमित्त चुकलेल्यांना व संकट ग्रस्तांना तर चांगला व योग्य रस्ता दिसावाच परंतू चुकून आपल्यातलेच दुखावलेले, दुरावलेले आप्तजन पुन्हा एकत्र नांदावेत, आनंदात रहावेत
ही श्री  स्वामी समर्थ  महाराज  चरणी प्रार्थना
       *🎉🎄🎁...हार्दिक शुभेच्छा...🎁🎄🎉*
                          
*शुभं भवंतु ॥*

Comments

Popular posts from this blog

เคเคคिเคนाเคธिเค• เคชुเคธ्เคคเค•े PDF เคธ्เคตเคฐुเคชाเคค

เคจाเคค्เคฏाเคค เคตाเคฆ เคจเค•ो เคธंเคตाเคฆ เคนเคตा. Heart touching story

เคจเคตเคฐा เคคो เคจเคตเคฐाเคš เค…เคธเคคो .