कथा

मी दोघानाही भेटायला बोलावलं तेंव्हा दोघेही निग्रहाने येणार नाही म्हणाले
आणि ठरल्यावेळी दोघेही हजर झाले
मला वाटतं लिफ्ट मधे सुद्धा एकत्रच असावेत
त्यानी त्याची म्हणून डोअर बेल वाजवली आणि दुसर्‍य़ा क्षणी तिने तिची म्हणून डोअर बेल वाजवली.. मी सुखावलो.. ही दोघांची जुनी सवय.. भांडले की आपापली स्वतंत्र बेल वाजवायचे..दार उघडलं की ती तरा तरा आत जायची आणि तो सहजपणाचा आव आणत गँलरीत जायचा.. आपण गप्प बसलेलं त्याला सहन व्हायचं नाही,
विचारणार सुद्धा नाही का, काय झालं? तो गुरगुरायचा
मी शांतपणे म्हणायचो भांडण झालय हे स्प्ष्ट दिसतय... की ती आतून बाहेर येत तावातावाने म्हणायची यावेळी माझ्यामुळे काहीही झालेलं नाहिये हं! हा वाट्टेल ते सांगेल... आणि तिच्या या वाक्यावर आक्षेप घेत तो पून्हा तणतणायचा
दोघाना तसच सोडून मी चहाचं आधण चढवायचो... पाण्याला उकळी यायची तसं यांचं भांडण तेजीत यायचं कितीही लक्ष देउन ऐकलं तरी काही कळायचं नाही, गेलास उडत गेलीस उडत हे मात्र नीट कळायचं,कारण ते सात आठ नऊ वेळा रिपीट केल्याशिवाय दोघे थांबायचेच नाहीत
इथे आधण मुरवत ठेवलं की तिथे त्यांच मौन वातवरण भारून टाकायचं
नंतरचा चहा मस्त हसत खिदळत संपायचा, हे दोघे कशावरून भांडतात? भांडले की इथे का येतात ? हे असले प्रश्न मनातच विरून जायचे
पण आज तसं झालं नाही, ना तो गँलरीत गेला , ना ती तरा तरा आत गेली
दोघं श्वास कोंडून माझ्या समोर बसले.. अंधारून आलेलं घर माझ्या त्याक्षणी लक्षात आलं , मी लाईट लावायला उठलो.. दोघानी एकदम आडवलं
मामा नको ना! बरं वाटतय असच.. दोघानही चोरट्या सारखं झालं..संभाषण पुढे नेणं गरजेचं होतं , कायरे येणार नव्हतात ना? असं मी विचारणं अगदीच टिपिकल वाटलं असतं त्या बदल्यात मी असं म्हणालो बरं झाल आलात..
तसे दोघे एकदम उस्फुर्तपणे म्हणाले खरं तर येणारच नव्हतो, येणारच नव्हते.. दोघानी परत एकमेका कडॆ बघितलं त्यांचं अवघडलेपण घालवायला मी म्हणालो बसा तुम्ही मी आलोच
चहा नकोय! दोघं सेम घाईच्या स्वरात म्हणाले
मी देवाजवळ दिवा लावयाला जात होतो, आपल्याला अंधारात बसायचय त्याची शिक्षा देवाला कशाला ?
तसा तो तिरसटत म्हणाला त्याला पण शिक्षा हवीच
आयला नको ती माणसं भेटवून गोची करून टाकतो... नको ती माणसं म्हणजे कोण? ते ही स्प्ष्ट कर ना? आणि आता कशाला घाबरतोस ? ब्रेकप तर केलच आहेस ना?
ब्रेकअप मी केलं नाही
हं! ती उपहासाने म्हणाली तू फक्त तशी परिस्तिथी निर्माण केलीस
परिस्तिथी मी निर्माण केली की तू?
माझ्यामते तू केलीस..दोन महिन्या पुर्वी नोकरी सोडलीस पण मला सांगितलं नाहीस, तरी मी विचारतेय हल्ली तू सारखा आँनलाईन कसा असतोस? तुझं रुटीन कसं इतकं बद्ललं? एक नाही की दोन नाही
मग तुला कळलं कसं?
एक नंबरने सांगितलं अगदी खत्रूडपणाचा कहर करत तो म्हणाला
एक नंबर ने सांगितलं? काना पेक्षा मनाला खटकलं म्हणून मी आवजात नाराजी आणत विचारलं.. आपण चुकलोय असं त्याला अजिबात वाटत नव्हतं
तिला मात्र ते जिव्हारी लागलं ती संतापलेली वाटली, तरी ती आधी दुखावली गेली होती..
मी म्हणालो एक नंबर दोन नंबर अशी गिनती करून तू हिचा अपमान करतोय्स असं नाही का वाटत?
हिला प्रपोझ करताना अंबरिशशी हिचं ब्रेक अप झालय हे तुला चांगलं माहीत होतं ना? तरी तू प्रपोझ केलस? मग तेंव्हा नाही हे लक्षात आलं की आपला दुसरा नंबर लागतोय?
माझ्या दृष्टीने तो अस्तित्वातच नव्हता,पण मी तडकाफडकी नोकरी सोडली ही
कुठून त्याने खबर काढली आणि हीला गाठून सांगितलं
मग तुला नक्की कशाचा राग आलाय? अंबरिश हिला भेटला? याचा? की त्याने हिला तू नोकरी सोडल्याचं सांगितलय याचा?
अंबरीश हिला भेटला याचा तुला राग आला असेल तर मग तुम्ही ब्रेक अप करायचा निर्णय घेतलात ते बरंच झालं, माझ्या मुलीची फरफट टळली.. मग सुखी होण्यासाठी एक नंबर दोन नंबर झाले तिथे आणखी तिसर्‍याचा नंबर लागला तरी बेहत्तर..हे मात्र वर्मी लागलं उसळून तो म्हणाला मामा तू मला अगदी युसलेसच समजतोस
मी म्हणालो तसं नाही! अंबरिश तिला भेटणारच नाही याची ग्वाही कोणीच देऊ शकत नाही, कारण हे महानगर असलं तरी इथले रस्ते वेटोळेच आहेत,कितीही जपून पावलं टाकली तरी कोण कुठे भेटेल हे सांगता यायचं नाही, त्यामुळे अंबरिश तिला भेटला हा रागाचा मुद्दाच होओ शकत नाही
लहान मुला सारखा वरमत तो म्हणाला मला त्या बद्दल राग आलाच नाहिये
मग कसला राग आलाय?
त्याला लगेच हिच्याकडे चुगली करायची गरज नव्हती
मग त्या साठी अंबरिशवर चीड.. हिच्यावर कशासाठी?
कारण त्याचं ऐकून ही माझ्याशी भांडायला आली
ए बिन्डोक तू नोकरी सोडलीस म्हणून भांडायला नाही आलेsss
मला का नाही सांगितलस म्हणून चिडले होते मी, इतका मोठा निर्णय तू तडका फडकी घेऊन मोकळा झालास? अरे लग्न करायच होतं आपल्याला
माझ्या समोर तिचे दोन्ही खांदे धरत त्याच्या नेहमीच्या स्टाईलने गदा गदा हालवत तो म्हणाला लग्न करायचं होतं आपल्याला

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .