*बाबा बघा ना..दिवाळी आलीय* (शहिदांच्या घरची दिवाळी)
*बाबा बघा ना..दिवाळी आलीय*
(शहिदांच्या घरची दिवाळी)
----------------
*बाबा....*
देशासाठी सिमेवर लढताना
शहीद झाले तुम्ही,
तुमच्या या विरमरणाने
मात्र पोरके झालो आम्ही.
तुमच्या शिवाय ऐन सणासुदित
घरावर अवकळा पसरलीय.!
*बाबा...बघा ना दिवाळी आलीय.!!*
सांगितले होते तुम्ही
या दिवाळीला सुट्टी घेइंन,
माझ्या साठी फटाके
अन् चिंगीला कपडे आणीन.
वाट बघतोय तुमची आम्ही
खोटिच आशा लागलीय.!
*बाबा..बघा ना दिवाळी आलीय.!!*
दररोज आजुबाजुचा परिसर
रोशनाइने उजळतोय,
आपल्या घरी मात्र फक्त
तुमच्या फोटो पुढील दीवा मिण मिंणतोय.
तुमच्या नसण्याने आमची
दिवाळी अंधारमय झालीय.!
*बाबा..बघा ना दिवाळी आलीय.!!*
सुवासिनी त्या नटून-थटून
नववस्त्रानी सजत आहेत,
आईचे मात्र आमच्या दरोज
साड्यांचे पदर भीजत आहेत.
बिना रंगोळीच्या आपल्या अंगणा सारखी,
तिच्या कपाळाची भग्न दशा झालीय.!
*बाबा..बघा ना दिवाळी आलीय.!!*
ते आजी-आजोबा सतत
चष्म्या आडुन अश्रु गाळतात,
विचारल्यावर त्याना 'धुर झोम्बतोय फटाक्यांचा'
असा खोटा बहाणा करतात.
न झोप त्यांच्या नयनाना
हुन्दक्यानी मात्र छाती घेरलीय.!
*बाबा..बघा ना दिवाळी आलीय.!!*
भाउबीजेला तुम्ही नऊवारी घेऊन,
आत्या कड़े जाणार होता,
मिठाई ची भेट देऊन मग
ओवाळून घेणार होता.
अशी कशी तिच्या आरतीवर
दैवान फुंकर मारलीय.!
*बाबा..बघा ना दिवाळी आलीय.!!*
*पण बाबा..*
आता मी ठरवलंय...
तुमच्या सारखाच मीही सैनिक होईन...
देशासाठी सिमेवर लढाईस जाइन..
दुष्मनावर विजय मिळविंन..
तेव्हाच मिठाई वाटेन,
तेव्हाच फटाके फोडेन,
आणि माझ्या स्वागताला
घरात रोशनाई असेल.
दारात रंगोळी असेल..
आईच्या हाती आरती असेल..
तीच आम्हा सर्वांची दिवाळी असेल..!!
खरेच बाबा आता मनाची तैयारी झालीय..
सलाम करतोय तुम्हाला...
अभीमानाने छाती भरून आलीय..
*बघा ना...दिवाळी आलीय..!!*
*...दिवाळी आलीय..!!*
🎇🇮🇳😭😭😭🇮🇳🎇
आवडल्यास शहीदांसाठी फक्त एक शेअर....प्लीज🙏🏻
Comments
Post a Comment