आपल्या आरोग्यासाठी आवश्यक खनिजे

*शरीराला आवश्यक खनिजं*
आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागाचं तसंच उपविभागाचं कार्य सुरळीत राहावं म्हणून त्यांना खनिजांची गरज असते. कारण शरीरातली प्रत्येक क्रिया मग ती रासायनिक असो किंवा हार्मोनल त्या प्रत्येक क्रियेत खनिजं महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
आपण जे अन्न सेवन करतो त्यात ही खनिजं नैसर्गिकरीत्याच परिपूर्ण असतात. आणि जे पदार्थ किंवा खनिजं शरीराला अनावश्यक आहेत ती मल- मूत्र किंवा घामावाटे शरीराबाहेर टाकली जातात. ही सगळी खनिजं निसर्गत:च उपलब्ध असतात.
तुम्ही कृत्रिमरीत्या शरीराला त्या खनिजांचा साठा पुरवण्याचा प्रयत्न केलात तर शरीर त्या खनिजांचा स्वीकार कजरत नाही परिणामी आपल्याला विविध आजारांना तोंड द्यावं लागतं. खनिजं ही कार्बनविरहीत रासायनिक तत्त्व असतात जी पाण्यामध्ये अगदी सहज विरघळतात.
निसर्गात २४ प्रकारची खनिजं असून त्यातली सात खनिजं ही अनिवार्य असतात आणि ती फळं, भाजी, धान्य, दूध आणि पाणी या नैसर्गिक गोष्टींमधून मिळतात.
*आपल्या शरीराला आवश्यक असणारी खनिजं*
*कॅल्शिअम*
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
कार्य काय असतं?
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
*लोह*
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असतं?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
*सोडिअम*
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
कार्य काय असतं?
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
*आयोडिन*
शिंगाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
कार्य काय असतं?
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
*पोटॅशिअम*
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
अॅतसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
कार्य काय असतं?
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
*फॉस्फरस*
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
कार्य काय असतं?
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
*सिलिकॉन*
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
कार्य काय असतं?
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
*मॅग्नेशिअम*
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
कार्य काय असतं?
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
*सल्फर*
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
कार्य काय असतं?
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
*क्लोरिन*
पाणी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
अॅतसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अॅालर्जी.
कार्य काय असतं?
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.

संदर्भ:- प्रहार

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .