*पु. ल. म्हणतात

*पु. ल. म्हणतात -*
*खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.*

*प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.*
*ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.*

*शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.*

*माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.*

*बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.*

*खरं तर सगळे कागद सारखेच…*
*त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.*

*रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.*
*पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.*

*आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.*

*सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.*

*कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.*

*रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.*

*आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय.*

*ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.*

आयुष्य फार सुंदर आहे...
*ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...*
*माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे..*
🌺🌺🌺🌺

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story