*युद्ध म्हणजे काय?*

*युद्ध म्हणजे काय?*

व्यंगात्मक पोस्ट लिहिण्याआधी खालील पोस्ट लिहिलेली कारण आताच्या पिढीतील लोकांनी युद्ध पाहिलेलं नसल्यामुळे त्यांना युद्धज्वर चढला आहे. पाकिस्तान समस्येवरील उत्तर सर्वकष युद्ध नसुन छुपं युद्ध हाच आहे आणि युद्ध करायचंच असल्यास आपल्याला सर्वोच्च त्यागाला तयार असलं पाहिजे.

बांगलादेश युद्ध भारताला १९७१ साली अंदाजे ४०० कोटी रूपयांना पडलं होतं. कारगील युद्ध १९९९ साली अंदाजे १०००० कोटी रूपयांना. फ्रुटीच दहा पंधरा रूपयांना मिळणारं पाकिट सियाचिनला पोहचेपर्यंत अंदाजे दोनशे रूपयांना पडत. सैनिकी जॅकेट प्रतिमाणशी दिड ते दोन लाख रूपये. एक न्युक्लियर मिसाईल साधारणपणे बारा कोटी रूपयांना पडते.

भारत पाकिस्तान युद्ध आण्विक हल्ल्यापर्यंत पोहचलं तर कोट्यावधी लोकांना जीव गमवावा लागेल. अख्ंड मुंबई सगळ्या लोकांसकट नष्ट होईल,  एखादी इमारती उभी करताना जे स्टीलचे बार वापरले जातात ते बार सुद्धा आण्विक हल्ल्यात पाघळतात, मानवी शरीरांच काय होईल याची कल्पना तुम्ही करू शकता. डोळे गेले , कान फुटले, हात पाय तुटले, आतडी त्वचा केस गळुन पडले अशा लोकांच्या संख्येचा हिशोब नसेल. ईलाज.करायला होस्पिटल नसतील, औषधांचे कारखाने नष्ट होतील.बॉंम्ब ज्या ज्या ठिकाणी पडेल त्या ग्राऊंड झिरोवरील मानवी वावर कित्येक वर्षांसाठी ठप्प असेल. मुंबई जवळ समुद्र असल्याने समुद्रात त्सुनामी लाटा येतील त्यामुळे अजुनच हानी होईल.

भारत पाकिस्तान आण्विक युद्धात अंदाजे ५० लाख टन कार्बन संपुर्ण जगात पसरेल. संपुर्ण आशिया खंडावर काळ्या ढगांची छाया पडलेली असेल. भारत पाकिस्तानचे शेजारी असलेल्या इराण , चिन, भुतान, बांगलादेश , नेपाळ , श्रीलंका , मालदिवला देखिल परिणाम भोगावे लागतील. ओझोन लेयरला मोठी छिद्र पडतील ज्याचा परिणाम म्हणुन त्वचा अतिनील किरणांनी भाजुन निघेल. वातावरण कित्येक महिने दिवसांसाठी थंडगार पडुन जाईल. संपुर्ण जगाच्या वातावरणात बदल घडेल.

संपुर्ण दळणवळण आणि संपर्क यंत्रणा ठप्प पडतील. अन्नपदार्थाचे साठे आणि उत्पादन उध्वस्त झाल्यामुळे जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होईल आणि भारताला परदेशी मदतीवर अवलंबून रहावे लागेल परंतु दळणवळण यंत्रणा बंद असल्यामुळे परिस्थिती आणखीनच भिषण होईल. अन्नपदार्थांसाठी दंगली उसळतील.

पाकिस्तान नष्ट झाल्यासारखाच असेल परंतु भारत सुद्धा जिंकला म्हणता येणार नाही कारण उरलेल्या जनतेला पुढील २० वर्ष किरणोत्साराचे परिणाम भोगावे लागतीलच. पाकिस्तान भिखारी देश आहे, गमावयाला त्याच्याकडे मुळात आहेच काय? पण आपल्याकडे गमावायला खुप काही आहे. जन्मणारी मुलं व्यंग असलेली जन्माला येतील आणि हा परिणाम पुढील कित्येक पिढ्यांना त्याची फळं भोगावी लागेल.

भारताच्या पुढील शासन व्यवस्थेला पुन्हा अश्मयुगापासुन सुरुवात करावी लागेल.    युद्धात हवाई हमले होतात. यात शत्रु देशाला जास्तीत जास्त नुकसान केल जात, यात तेल विहीरी, रीसर्च सेंटर, तेल साठे, लष्करी /नाविक तळ, पिण्याच्या पाण्याचे साठे, धरण , मोठी शहर ,दळण वळणाचे मार्ग, रेल्वे , विमानतळ, टेलीकम्युनिकेशन ची सर्व साधन ही सर्व साधन उध्वस्त केली जातील.. फक्त कोयना धरण फोडल, तर प्रचंड पाण्याने क्षणात पूर येईल, शेकडो गाव पाण्याखाली जातील, अपरीमीत हानी होईल, प्रेतांचा खच पडेल, महामारी पसरेल, पूर ओसरल्यावर प्रचंड वित्तहानी झालेली असेल, नंतरचे काही महीने पाण्याअभावी दुष्काळ पडेल.

अमेरिकेने ज्या देशाशी शत्रुत्व केलं ते देश त्यांच्या आजूबाजूला नव्हते ते तिकडे घुसून त्यांच्या शत्रूला त्यांनी अद्दल घडवली पण पाकिस्तान हा आपल्याला अगदी बाजूचा देश आहे....जरा विचार करा त्यात आपल्या देशाचं नुकसान होणार हे निश्चित.....जर आपल्याला इतकाच राग किंवा युद्ध करायची इच्छा होत असेल तर जा जरा आपल्या सीमेवर असलेल्या जवानांना विचारा कि किती सोप्प असतं युद्ध करणं..... उगाच कोणाच्याही भडकाऊ पोस्ट मुळे फोटो मुळे आपली डोकी खराब करून घेऊ नका...त्यांना त्याचं काम करू द्या तुम्ही तुमचं काम करा

हे सगळं वरवरचं लिहिलेलं आहे. थोडक्यात समजुन घ्या.काय आपण या सर्व गोष्टींसाठी खरच तयार आहोत? विचार करा ?

Whatsapp share.

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story