एच आर मेनेजर चा मुख्य उद्देश

बायको- चला आज जेवायला बाहेर जाऊ
नवरा-( एच आर मेनेजर)-ओके
नवरा- एखाद्या स्वस्त हॉटेलात जाऊ
बायको-नको फाइव स्टार हॉटेल मधे न्या
नवरा- ( 1मिनिट विचार करुन) ठीक आहे 7 वाजता जाऊ आपण
...वाटेत जाता जाता ...
नवरा- एकदा माझी आणि माझ्या बहिणीची पानीपुरी खायची शर्यत लागली होती आणि तिने मला 30पानीपुरी एकावेळी खावून हरवले होते
बायको- त्यात एवढे अवघड काय आहे?
नवरा - मला पानीपुरी च्या शर्यतीत हरवने अवघड आहे
बायको- मी सहज तुम्हाला हरवू शकते
नवरा- सोड ना हे तुला शक्य नाही
बायको- चला आताच फैसला होवू दया
नवरा- म्हणजे तुला हरण्याची इच्छा आहे..
बायको- बघु तर कोण हरतय
दोघे पानीपुरी च्या दुकानात जातात आणि पानीपुरी खायला सुरवात करतात
30 पानीपुरी खाल्ल्यानंतर नवरा म्हणतो बास आता मी हरलो
त्याच्या बायकोचे पण पोट भरलेले असते पण त्याला हरवण्या साठी ती अजुन एक खाते आणि म्हणते मी जिंकले
बिल निघते 50 रुपयाचे आणि जिंकल्याचा आनंदात घरी परत येते

गोष्टीचा अर्थ- एच आर मेनेजर चा मुख्य उद्देश कामगारांना कमीत कमी गुंतवणुकीत समाधानी करण्याचा असतो. जिंकल्याचे समाधान कमी खर्चात. आणि त्या खर्चात जास्त परताव्यचि हमी😀😀

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .