करोडपती होण्यासाठी या ५ गोष्टी करा
करोडपती होण्यासाठी या ५ गोष्टी करा
1पैसे रुपी बीजचे चांगल्या वृक्षात रुपांतर करण्याची कला. आपण शेतकऱ्याला पाहिले आहात का? तो बियाणे टाकून चांगले रोप तयार करतो आणि शेतीतून चांगल्या प्रकारे धान्य घेतो. त्याच प्रमाणे तुम्ही छोटी गुंतवणूक करायला शिका. १० रुपयांना १०० रुपयांत बदल करु शकता. करोडपती लोकही लहान-सहान गुंतवणूक करतात. 2.करोडपतींच्या तिजोरीत पैसा अनेक माध्यमांतून येतो. तुम्ही एकाद्या टाकीत किंवा बॅलरमध्ये पाणी भरण्यासाठी पाईपचा उपयोग करता. त्यामुळे टाकी किंवा बॅलर लगेच भरण्यास मदत होते. जर जास्त पाईप लावले तर तात्काळ पाणी फुल होते. त्याचप्रमाणे करोडपती आपल्या तिजोरीत पैसै आणण्यासाठी पाईपलाईनचा उपयोग करतात. ते अनेक ठिकाणी गुंतवणूक करतात. त्यातून त्यांना पैसे कमविण्याचा नवा पर्याय उपलब्ध होतो आणि त्यांची तिजोरी भरते. 3.करोडपती आपल्या कामाबाबत आणि पैशाबाबत जाणून घेतात. पैशाची गुंतवणूक करताना इन्कम आणि मार्केटची सर्व माहिती असणे गरजेचे असते. गुंतवणूक करताना मार्केटमध्ये तेजी आणि मंदी आहे, हे बघून गुंतवणूक करण्याचे फायद्याचे असते. त्यामुळे तुमचा उत्पन्नाचा सोर्स वाढतो. 4.आपण विशेष प्रयत्न करुन अंदाज बांधा. काही लोक काहीही अभ्यास न करता ट्रिक्स वापरतात. मात्र, त्यात ते यशस्वी होत नाही. मात्र, जे हुशार लोक असतात ते योग्य ट्रिक्स वापरुन त्यात यशस्वी होतात.५ रुपयांची वस्तू ५० रुपयांना समोरच्याला समजून देऊन त्यातून पैसे कमविण्याची ट्रिक्स जोर वापरतो, त्याच्याकडे पैसे येतात. 5.काही करोडपती स्वत:शीच स्पर्धा लावतात. महाविद्यालय किंवा ऑफिसमध्ये काही लोक अव्वल येण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात. मात्र, करोडपती लोक असं करत नाहीत. ते स्वत:शीच स्पर्धा लावतात. ते यात यशस्वी होण्यासाठी आपले टार्गेट पूर्ण करण्यावर भर देतात आणि ते टार्गेट पूर्ण करुन पुढे जातात. हे लोक आधी लखपती बनतात आणि त्यानंतर ते करोडपती, अरबपती होतात. तरीही ते पैसे कमिवण्याचे सोडत नाहीत.
Comments
Post a Comment