भारताचे नऊ सर्वोत्कृष्ट कमांडो फोर्स

भारताचे नऊ सर्वोत्कृष्ट कमांडो फोर्स
--------------------------***---------------------------
आज आपण ओळख करुन घेणार आहोत भारताचे महत्त्वाचे कमांडो फोर्स, ज्यांच्यासमोर शत्रू गुडघे टेकतात, अशा नऊ सर्वात घातक, शानदार आणि इंटेलिजंट कमांडो पथकांची ज्यांची गणना जगातील सर्वोत्तम सुरक्षा दलांमध्ये केली जाते.

१)  एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) किंवा ब्लॅक कॅट्स

एनएसजी हे भारताचं प्रमुख दहशतवादविरोधी दल आहे. यांच्या काळ्या रंगाच्या गणवेशामुळे त्यांना ‘ब्लॅक कॅट्स’ असं सुद्धा म्हणतात. एनएसजीची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली होती. एनएसजीची निवड प्रक्रिया एवढी खडतर असते की ७०-८० टक्के उमेदवार नापास होतात. निवड झालेल्या जवानांना ९ महिने अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं.  एनएसजीमध्ये निवड झालेले कमांडो हे सैन्यदल, पोलिस आणि पॅरामिलिटरीमधील सर्वोत्कृष्ट जवान असतात. भारतीय पोलीस दलाचे महासंचालक एनएसजीचे प्रमुख असतात. एनएसजीकडे व्हीआयपी सुरक्षा आणि घातपाती कारवाया रोखण्याची जबाबदारी असते.

२)  एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप

हे कमांडो आपण पंतप्रधानांच्या आसपास पाहिले असतीलच. एसपीजीची स्थापना १९८८ मध्ये झाली होती. एसपीजी कमांडोकडे पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजीची स्थापना करण्यात आली होती. हे जवान अतिशय चपळ आणि सजग असतात तसेच अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असतात.

३) मार्कोस कमांडो 

काळी वर्दी, चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला चेहरा आणि गॉगल असलेले मार्कोस कमांडो. मार्कोस हे भारताच्या नौदलाचे स्पेशल आणि सर्वात घातक कमांडो आहेत. 1987 मध्ये मार्कोसची स्थापना करण्यात आली होती.  मार्कोसना अतिरेकी ‘दाढीवाला फौज’ म्हणून ओळखतात. मार्कोस कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यास सज्ज असतात पण समुद्री सुरक्षेमध्ये ते विशेष पारंगत असतात. या कमांडोंकडे हवेतून समुद्रात उडी मारणं तसेच पाण्यातून डोकं बाहेर काढून गोळीबार करण्याची क्षमता असते.  त्यांचं प्रशिक्षण हे अत्यंत खडतर असतं. यासाठी अर्ज केलेले जवळपास ८०टक्के उमेदवार चाचणी फेरीतचं अयशस्वी होतात. मार्कोस कमांडो पूर्वी मरीन कमांडो फोर्स म्हणजेच एमसीएफने ओळखले जात होते. 26/11 मुंबई हल्ल्याच्या ऑपरेशनमध्ये मार्कोस कमाडोंना बोलवण्यात आलं होतं.

४)  गरुड कमांडो

हे भारतीय हवाई दलाचं विशेष पथक आहे. गरुड पक्षाच्या आधारावर या फोर्सचं नाव ठेवण्यात आलं आहे. एनएसजी आणि मार्कोसच्या धर्तीवर 2004 मध्ये या दलाची स्थापना करण्यात आली होती. ‘गरुड’मध्ये जवळपास २००० जवानांचा समावेश आहे. हवाई हल्ले, रेस्क्यू ऑपरेशन, दहशतवादविरोधी कारवाया, हवाई  शोध मोहिमेत,  गरुड कमांडोंचा वापर केला जातो. यांचं प्रशिक्षण साधारण तीन वर्ष चालतं जे इतर सर्व सुरक्षा दलांपेक्षा जास्त आहे. 

५)  पॅरा कमांडो

पॅरा कमांडोंची स्थापना १९६६ मध्ये करण्यात आली होती. ते भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा भाग आहेत. त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं, शत्रूवर मागून वार करून त्याची पहिली फळी उद्ध्वस्त करणे. जगातील अत्यंत कठीण प्रशिक्षण या कमांडोना दिलं जातं, जसं की ६०किलो वजन घेऊन रोज २०किमी धावणं. एलीट पॅरा कमांडोंना हवेत मारा करण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आलं आहे. हे कमांडो 30 ते 35 हजार फुटांच्या उंचीवरुन उडी मारण्यात तरबेज असतात. १९७१चं युद्ध, कारगिल युद्ध आणि ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ मध्ये पॅरा कमांडोंचा वापर करण्यात आला होता. भारतीय सैन्यातील हे एकमेव दल आहे ज्यांना अंगावर टॅटू काढण्याची मुभा असते. 

६)  फोर्स वन’

मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर एनएसजीच्या धर्तीवर महाराष्ट्रात `फोर्स वन’ या कमांडो पथकाची 2010 मध्ये स्थापना करण्यात आली होती. यांच्याकडे मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. 'फोर्स वन' पथक घटनास्थळी अवघ्या १५ मिनिटांत पोहोचते, जी जगातील सर्वात जलद वेळ आहे. सलाम... ३००० अर्जदारांपैकी २१६ जणांची निवड करून हे पथक बनवलं आहे. या जवानांना इस्राईली ‘मोसाद’ सैन्याने विशेष प्रशिक्षण दिलं आहे.

७)  कोब्रा म्हणजे कमांडो बटालियन फॉर रिझॉल्यूट अॅक्शन

कोब्राची स्थापना 2008 मध्ये झाली होती. कोब्रा बटालियन CRPF चाच एक भाग आहे या कमांडोंना गोरिला तंत्राचं ट्रेनिंग दिलं जातं. कोब्रा कमांडो जंगलात वेश बदलण्यापासून दबा देऊन हल्ला करण्यात तरबेज असतात. यांचा वापर मुख्यत्वे नक्षलविरोधी मोहिमेत केला जातो. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असं हे पोलिसांचं सर्वोत्तम दल आहे. तसेच  कोब्रा स्नायपर युनिटची गणना देशातील सर्वोत्तम सुरक्षा रक्षकांमध्ये होते.

८) घातक कमांडो

नावाप्रमाणेच हे कमांडो अतिशय घातक असतात. भारतीय लष्कराच्या प्रत्येक बटालियन मध्ये साधारण २० 'घातक' कमांडोंचा समावेश असतो. यांची मुख्य जबाबदारी म्हणजे बटालियनच्या पुढे राहून शत्रूच्या मुख्य ठिकाणांवर थेट हल्ला करणे, तेथून महत्त्वाची माहिती गोळा करणे, शत्रूच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे, अपह्रत व्यक्तीला सोडवणे. शत्रूशी थेट सामना करावा लागत असल्याने या कमांडोना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम जवानांचीच घातक कमांडो म्हणून निवड केली जाते.

९) स्पेशल फ्रंटियर फोर्स

एस एफ एफ ची स्थापना १९६२ साली भारत-चीन युद्धानंतर करण्यात आली होती. एसएफएफचं मुख्यालय उत्तराखंडमधील चक्रता येथे आहे. ही फोर्स संरक्षण खात्याच्या अंतगर्त नसून ती भारतीय गुप्तचर खात्याच्या (रॉ) च्या अखत्यारीत काम करते आणि कॅबिनेट सचिवांना उत्तरदायी असते. या जवानांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी गोरिला तंत्र, पर्वत, जंगलातील कारवाया आणि पॅराशूट मधून उडी मारण्याचं प्रशिक्षण दिले जाते. एसएफएफने १९८५च्या सियाचीन युद्धात ऑपरेशन मेघदूत मध्ये प्रमुख भूमिका बजावली होती.

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .