देवाची कृपा म्हणुन पदरात एक पोरगी टाकली त्याने .

अभ्या " मुलगीच " झाली रे . मित्राने फोन केला , तो ही परदेशातून . बातमीच नुसती ती , आनंदाची की दुःखाची कशी ठरवणार ? त्याच्या बोलण्यात मात्र खंत जाणवत होती . पहिल्या मुलीनंतर त्याला मुलांची अपेक्षा सहाजिक होती . पण "मुलगीच" झाली रे ,  बोचत होतं कुठतरी आतमधे मला .

मी नुसताच हसलो . अभिनंदन , साल्या नशीबवान आहेस , मुलांच्या सेटलमेंट च टेंशन नाही , की म्हतारपणात लाथा नाहीत . मी विषयाला हात घातला . तुझ ठिक आहे रे , बोलण सोपं आहे दोन्ही मुलींवर थांब म्हणुन , त्याचा आवाज अजुन खोल होत गेला .

मग मात्र मी त्याला थेट भिडायच ठरवल . तुम्ही दोघे भाऊ ना रे , आणि एक बहिन . तुम्ही दोघ परदेशात आणि बहिन एकटीच इथ ना . तो हो म्हणाला . तुझ्या आईची अँजोप्लास्टी झाली ना रे दोन महिन्या पूर्वी . तुम्ही दोघे आला नाहीत . मी गेलो होतो काकुंना भेटायला . तुझी बहिन सासरी राहून सगळ पहात होती रे , अगदी मना पासुन . तुम्हा दोघा भावांपैकी एकाला ही वेळ नव्हता रे . तुला माहीत आहे काकू निघताना काय म्हणाल्या,
देवाची कृपा म्हणुन पदरात एक पोरगी टाकली त्याने .

बस खुप वेळ शांतता...
आणि नंतर फक्त एकच शब्द.....
सॉरी यार.

( व्हाट्सअप वर आलेला सुंदर मेसेज.)

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .