D.J फक्त पार्टीची शोभा वाढवतो..उत्सवाची नाही..

एका मित्राच्या बर्थडे पार्टी होती.एका छानशा बँक्वे हॉल मध्ये ही पार्टी ठेवली होती.मित्राचे बरेच ओळखीचे आणि परिचयाचे लोक तिथे आले होते.."हाय हॅलो "वगैरे सगळं झालं.मलाही माझे कॉलेज मधले कॉमन मित्र भेटले..पार्टी रंगात येऊ लागली होती.मग जेवणाच्या आधी 'ड्रिंक्स & डान्स ' चं आयोजन होतंच.

सगळ्यांचे हात ग्लासांनी भरले..डी.जे चं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं..नाचायला पूर्ण तयार झालेली लोक, आता कुठलं गाणं हा डी.जे लावेल आणि त्यावर कुठल्या स्टेप्स वर नाचायचं ह्यावर काही उत्साही मंडळी चर्चा करत होती.आणि गाणं सुरु झालं..

"गजानना श्री गणराया,आधी वंदू तुज मोरया ..मंगलमूर्ती...."सगळे आलेले लोक अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागले.बर्थडे पार्टी,हातात दारूचे ग्लास आणि कसलं हे गाणं ? " गजानना गणराया ? " लोकांची कुजबुज जाणवण्याएवढी वाढली..शेवटी त्या उत्साहावर पाणी पडलेल्या एकाने विचारलं, "ए हे काय..पार्टीत काय हे गाणं लावता  ? कोई पार्टीवाला गाना लगाओ यार "- तसा माझा मित्र, ज्याचा वाढदिवस होता, हातात माईक घेऊन स्टेजवर चढला..

"मित्रांनो..माझी बर्थडे पार्टी आहे.आता पार्टी म्हंटली कि त्यात कुठचंतरी पार्टी सॉन्ग वाजेल अशीच तुमची अपेक्षा होती ना ? अर्थात असणारच..पण जसं एखाद्या पार्टीत, हे 'गजानना गणराया 'गाणं शोभत नाही ना,तसंच एखाद्या गणपतीच्या मांडवात देखील एखादं पार्टी सॉन्ग शोभत नाही..पण त्यावेळेस आपण आपला विरोध दर्शवतो का? नाही..' आपल्याला काय करायचंय ' म्हणून सोडून देतो..पण हे चुकीचं आहे..गणेशोत्सव हा 'उत्सव 'आहे आणि गणपती हा आपण देव मानतो.त्याला ' Show -Piece 'करून ठेवू नका..आत्ता ह्या पार्टीत जसा विरोध दाखवलात ना,तसंच विरोध एखाद्या गणपतीच्या मांडवात सुद्धा दाखवा..D.J फक्त पार्टीची शोभा वाढवतो..उत्सवाची नाही..हे लक्षात ठेवा..हातात दारूचे ग्लास,पार्टीत बरे वाटतात..गणपतीच्या मिरवणुकीत नाही..विरोध दर्शवा.आपण गप्प बसतो म्हणून हे खूळ बोकाळलंय..सगळीकडे दारू आणि डी.जे चालणार नाही हे कळूदे ना गणेशोत्सव मंडळांना..
अशा उत्सव मंडळांना वर्गणी,देणगी जाहिरात देऊ नका जिथे असला थिल्लरपणा चालत असेल..मग बघा परिवर्तन होतं कि नाही ते..आणि..सो सॉरी.मला ही गोष्ट खटकते..गणपती यायला आता फक्त 10-12 दिवस उरलेत..आणि आज तुमच्यापर्यंत माझा विचार पोचावा अशी माझी इच्छा होती.,म्हणून हे सगळं मीच घडवून आणलं..Now enjoy your Party Friends .." -म्हणत हा खाली उतरला..टाळ्यांचा कडकडाट झाला..

मी मात्र नाचण्या ऐवजी ड्रिंकचा आस्वाद घेणं prefer केलं ..हा माझा मित्र माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि खांद्यावरहात ठेवत म्हणाला, "काळे, लोकांना ना ज्या भाषेत समजतं, त्याच भाषेत समजवावं लागतं..कशी वाटली आयडिया ? " -तसं मी हसत म्हटलं, " साल्या, डोक्याचा उपयोग अगदीच उशीवर ठेवण्याकरता करत नाहीस.ग्रेट.चियर्स "..

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story