उद्योगाचे कानमंत्र

*उद्योगाचे कानमंत्र :*

1) कुणीही मनुष्य *जन्मतः बिझनेसमन* नसतो. ते कौशल्य अनुभवाने मिळवता येते.

2) व्यवसायासाठी *राग* हा दुर्गुण आहे, पण *ईर्ष्यायुक्त आकांक्षा* हा गुण ठरतो.

3) कोणताही व्यवसाय *तीन वर्षांनंतर* बाळसे धरतो. तितके *थांबण्याचा* संयम हवा.

4) व्यवसाय नफा *कमावण्यासाठीच* करा, मात्र सुबत्ता आल्यावर समाजाला *विसरु* नका.

5) *प्रतिष्ठा* माणसाला नसून *पैशाला* आहे. पैशाचे आणि गुंतवणुकीचे *महत्त्व* ओळखा.

6) व्यवसाय करण्यासाठी *विशिष्ट शिक्षण* गरजेचे नसते. नोटा *मोजायला* येणे पुरेसे ठरते.

7) ग्राहक *देव* असतो आणि तो कोणत्याही *धर्माचा, भाषेचा असल्याने* सर्व भाषा व धर्मांचा आदर करा.

8) *‘दिमाग मेरा पैसा तेरा,’* हे सूत्र लक्षात ठेवा. *व्यवसाय हा स्वतःच्या बुद्धिमत्तेने, पण बँकांकडून कर्ज घेऊन करा.* मात्र *कर्जफेड* काटेकोर व नियमितपणे करा.

9) व्यवसायात कोणतेही काम *लहान अथवा हलके* मानू नका. कष्टाची तयारी ठेवा.

10) संधींवर लक्ष ठेवा. *‘मोका देखके चौका मारनेका,’* हे तत्त्व पाळा.

11) एक व्यवसाय *न* जमल्यास दुसरा करा, परंतु *उद्योग क्षेत्रातून* काढता पाय घेऊ नका.

12) *भरपूर पैसा मिळवा. तो साचवून ठेऊ नका. कुटूंबासहित पैसा एन्जॉय करा आणि गरजूंना मदतही करा.*

13) पैशाचा पाठलाग करत *आरोग्याचा बळी* देऊ नका. व्यसने, चैनबाजी, दिखावा यापासून दूर राहा.

14) शुद्धता, नम्रपणा, प्रामाणिकपणा आणि आई-वडिलांचे *संस्कार* धंद्यात यशाला कारणीभूत ठरतात.

15) व्यवसायात *समस्या* येतातच, परंतु त्यातील *९५ टक्के समस्या संयमाने शांत राहून* सोडवायच्या असतात.

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .