लोकांच्या अपेक्षांचा अंत कधीच पुर्ण होत नाही.?......

मी दुपारी दुकान बंद करुन घरी जेवायला चाललोच होतो.
तेवढ्यात एक कुत्रा तोंडात पिवशी घेऊन दुकानात आला ,
त्या पिवशीत सामानाची लिस्ट व पैसे होते.
मला आश्चर्य वाटले , मी लिस्ट मधील सर्व सामान त्या पिवशीमध्ये भरले व सामानाचे पैसे घेऊन बाकीचे पैसे त्या पिशवीत ठेवले .
कुत्रा ती पिशवी तोंडात घेऊन निघाला.
मी तो कुत्रा कुठे जातो हे पाहण्यासाठी त्याच्या मागे निघालो.
कुत्रा बसस्टाॅपवर येऊन एका बसमध्ये चढला ,
मी ही त्याच्या मागे बसमध्ये चढलो .
पिशवीवर स्टाॅपचे नाव लिहले होते कंडन्टरने पिवशीमधील पैसे घेऊन एक तिकीट त्याच्या पिशवीत ठेवले .
स्टाॅप आल्यावर कुत्रा बरोबर त्याच स्टाॅपला उतरला ,
मी ही त्याच्या मागे उतरलो .
थोडे पुढे चालुन गेल्यावर कुत्रा एका घराजवळ थांबला व त्या घराची बेल वाजवली.
एका माणसाने दार उघडले त्याच्या हातात काठी होती .
त्या माणसाने सामान घेऊन त्या कुत्र्याला काठीने खुप मारले .
मी त्या माणसाला माझी ओळख सांगुन कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले.
तो माणुस म्हणाला साल्याने माझी झोपमोड केला चावी घेऊन गेला असता तर माझी झोपमोड झाली नसती.
,
,
,
,
जीवनाची ही खरी सच्चाई आहे
,
लोकांच्या अपेक्षांचा अंत कधीच पुर्ण होत नाही
,
जिथे तुम्ही थोडे चुकलात किंवा त्यांना मदत करण्याचे थांबवाला की तुम्ही मागे केलेली मदत ते विसरुन तेच लोक तुमची निंदा चालु करतात
त्याकरीता तुम्ही तुमचे कर्म करत चला , कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करु नका कारण कोणीच तुमच्याकडुन कायमस्वरुपी संतुष्ट होणार नाही.......
शेअर करा
वाचुन थोडे दुखः हलके होईल

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .