๐ฏเคฐांเคोเคณी๐ฏ
🔯रांगोळी🔯
-----------------------
स्वस्तिक हे मंगलचिन्ह म्हणून ओळखलं जातं. तसे पुरावे पाषाणयुगापासून मिळतात.मोहेंजोदाडो इथल्या उत्खननात स्वस्तिक हे चिन्ह सापडलं होतं. आदिमानवाने तयार केलेलं हे धर्मप्रतीक असून इंद्र,वायू,सूर्य,पृथ्वी अशा अनेक देवता स्वस्तिक या धर्मप्रतिकात एकत्रित सामावलेल्या आहेत. त्यामुळे स्वस्तिक रेखाटलं जातं.स्वस्तिक हे मंगल चिन्ह म्हणून ओळखलं जातं. स्वस्तिकातल्या उभ्या तसंच आडव्या रेषा या पृथ्वी आणि आकाश रेषा म्हणून ओळखल्या जातात. गतिमान जीवनात एकाग्रता लाभावी म्हणून स्वस्तिक काढतात.स्वस्तिक हे मांगल्याचं, गतीचं,चार दिशांचं शुभप्रतीक मानलं जातं.
याशिवाय एकलिंगतोभद्र, अष्टलिंगतोभद्र, सर्वतोभद्र अशाही रांगोळ्या धर्मकृत्यात काढल्या जातात. यात मोठ्या चौकोनातले बारीक चौकोन विशिष्ट पद्धतीने, कुंकवाने भरून त्यातून शिवलिंगाची आकृती निर्माण करायची असते. या रांगोळ्या शैवधर्माशी संबंधित आहेत. रांगोळी मुख्यत्वे स्त्रियाच काढतात.
रांगोळीतल्या प्रत्येक आकृतीचा प्रारंभ तिच्या केंद्रातून होत असतो. रांगोळीचे आकृतीप्रधान व वल्लरीप्रधान असे दोन मुख्य भेद आहेत.
आकृतीप्रधान रांगोळी राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारत, उत्तर प्रदेशात आढळते. तिच्यात रेषा, कोन आणि वर्तुळं ही प्रमाणबद्ध दिसतात. तिच्यात फुलपत्री, वृक्षवल्ली आणि पशूपक्षी यांना प्राधान्य असतं.
तामिळनाडूचं कोलम, कर्नाटकातली रंगोली आणि केरळातलं पुविडल हे सगळे रांगोळीचेच प्रकार होत.
चौसष्ट कलांमध्ये रांगोळी या कलेचा उल्लेख वात्स्यायनाच्या कामसूत्रात आढळतो.
त्याकाळी धान्याचा उपयोग करून रांगोळी काढत. सरस्वतीच्या मंदिरात तसंच कामदेव आणि शिवलिंग यांच्या पूजेसाठी विविधरंगी फुलांनीही आकृतीवंधात्मक रांगोळी काढत. ' देशीनाममाला ' या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढत असल्याचा उल्लेख आहे. मराठी वाङ्मयात रांगोळीचे अनेक ठिकाणी निर्देश झाले आहेत. या सर्व संदर्भांवरून रांगोळी ही कला सुमारे २ हजार वर्षांपूर्वीपासून प्रचलित असल्याचं कळतं.हींदू, जैन व पारशी या धर्मात रांगोळी ही अशुभनिवारक व शुभप्रदत मानलेली आहे.
श्री आनंदघनराम रांगोळीचं तात्विक रहस्य विशद करताना लिहितात,
*'केरसुणी फिरवताना किंवा सारवताना जमिनीवर सूक्ष्म रेषा निर्माण होतात. त्यात एक प्रकारचं कंपन असतं.या रेषा अनियमित असल्याने त्यांचं कंपनही अनियमित असतं. हे अनिष्ट कंपन टाळण्यासाठी सारवलेल्या जमिनीवर कोन आणि शुभ चिन्हं व्यवस्थित रूपाने रांगोळीच्या माध्यमाने काढली की झाडल्याचे व सारवल्याचे अशुभ परिणाम दूर होऊन शुभ परिणामांची प्राप्ती होते.* '
रांगोळी डोळ्यांना आल्हाद आणि मनाला उत्तेजन देते.रांगोळीचा पांढरा रंग शुभशकुनी मानला जातो.
*हिरवा रंग - मंगलदायक*
*लाल रंग - शक्तिशाली*
*पिवळा रंग - मंगलकार्यात शुभ*
काळा रंग अशुभ मानला जातो.
रांगोळीचा उगम धर्माच्या अनुबंधाने झाला आहे. दिवाळीत दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगाने भरतात. जुन्या काळी प्रत्येक घरी रोज देवापुढे सडासंमार्जन करून रांगोळी काढण्याची प्रथा होती आणि
*रांगोळीतल्या आकृत्या*
-चिन्हांचे विशेष अर्थ आहेत. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी कोणत्या दिवशी आणि कुठे कोणती रांगोळी काढावी याचेही नियम होते.
रोज देवापुढे आणि घराबाहेर देवीची पावलं रेखाटावीत. देवीची पावलं रेखाटताना उजवं पाऊल पुढे तर डावं पाऊल जरासं मागे काढलं पाहिजे. डाव्या पावलावर हळद वाहावी. उजव्या पावलांवर कुंकूसोबत शंख,स्वस्तिक आणि कमळ रेखाटावं.
सोमवार - बेलाचं पान, नागराज आणि त्रिशूल - डमरू या भगवान शंकराच्या आवडत्या वस्तू रांगोळीच्या माध्यमातून रेखाटाव्यात. मंगळवार आणि शुक्रवार
या देवीच्या वारी कमळाची रांगोळी पण जरा नवीन पद्धतीने काढावी.बुधवार - विष्णुचं वाहन म्हणून गरूड काढलं जातं.
गुरुवार - कमळ , ज्ञानकमळ,गोपद्मं काढावीत. रविवार - या दिवशी सूर्यदेवता काढली जाते.
नागपंचमीला नागदेवतेची रांगोळी काढतात. पाच ठिपके, पाच ओळी काढून ठिपक्यांच्या मध्ये दोन उभ्या तसेच दोन आडव्या रेषा काढून त्या गोलाकार पद्धतीने जोडल्या जातात. अलिकडे रांगोळीत व्यक्तिचित्रं तसंच प्रसंगचित्रंही काढली जातात. रांगोळ्यांची प्रदर्शनं,स्पर्धा भरवण्याची पद्धत रूढ होत आहे. पाण्यावरचे गालिचे म्हणजे रांगोळीचाच एक प्रकार होय. अलिकडे फेव्हिकॉलमध्ये रंग मिसळून दरात कायमस्वरूपी रंगीत रांगोळी काढतात
Comments
Post a Comment