सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित आणि शांतपणे पार पाडणार्या या 'आईला' मानाचा मुजरा ... !

लेकुरवाळ्या आईला कधीही रात्रभर सलग झोप घेता येत नाही.

कधीही शिस्तिने बसून ताटभर जेवण एकमार्गी संपवता येत नाही.

'एक घास बत्तीस वेळा चाऊन खावा' असं मुलाला शिकवण्याच्या काळात तिला मात्र बत्तीस घास एकदाच गिळून मोकळं व्हाव लागतं.

त्यातही एकदा तरी उठून, स्वतःचा उजवा हात धूऊन, पोराचा नको तो अवयव धुवायची वेळ येते.
(जी रोजच येते) �

मातृत्वाची महती कळायला लागते मध्यरात्री घरदार ढाराढूर झोपलेलं असतांना, झोपेजल्या डोळ्यांनी दिव्याची उघडमीट करून 'दिवा कच्चा लागतो' ... !

अच्चा....अच्चा ' म्हणून दिवट्याला खेळवतांना 'तारें जमीपर ऐवजी 'काजवें आँखोपर ' अशी तीची अवस्था होते.

रांगत्या मुलाच्या मागे घरभर पळणं, मुलानं पलंगाखाली फेकलेली खेळणी स्वतः रांगत खाली जाउन आणून देणं, मुलानं तोंडातून काढलेलं दूधाचं कारंज स्वतःच्या कपड्यांवर झेलणं, एकाच गाण्याची ओळ तीन तासात तीन हजार वेळा म्हणणं, त्याला आपले केस मनसोक्त ओरबाडू देणं, ह्या गोष्टि अजिबात सोप्या नसतात.

त्या करायला उर्फ मुलाला करू द्यायला भरपूर चिकाटी लागते.  सहनशक्ति लागते. अभिनयगूण लागतो. आळस, कंटाळा हे शब्द आईला आपल्या शब्द कोशातून हद्दपार करावे लागतात.

शिवाय हे सगळं करायला आई जवळ कसलेही प्रशिक्षण नसतं.
एरवी तासा - दोन तासाच्या उद्योगांचेही प्रशिक्षण दणार्या संस्था आहेत.

आईपण हा एक पूर्ण वेळचा, आयुष्य व्यापून टाकणारा उद्योग असला तरी त्याला प्रशिक्षण नाही.

मूल वाढवणं  हा आईच्या द्रुष्टिने स्वतंत्र प्रयोग असतो. 
जो यशस्वी झाला तर कोणी टाळ्या वैगरे वाजणार नसतं.
पण अयशस्वी झाला की, आईचा उध्दार होणं अपरिहार्य असतं.

तरी पण सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित आणि शांतपणे पार पाडणार्या या 'आईला' मानाचा मुजरा ... !

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story