आई
बाळ जन्म घेण्याच्या आगोदर देवाने त्याला सांगितले,
'' आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल....''
हे ऐकून मुलगा रडायला लागला....आणि त्याने विचारलं,
'' तिथे माझी काळजी कोण घेणार??? ''
देव म्हणाला , '' मी एक परी पाठवली आहे...ती तुझी खूप छान काळजी घेईल..''
बाळाने पुन्हा विचारलं, '' मला बोलायला कोण
शिकवणार??? '' देव म्हणाल, '' तीच परी तुला बोलायला शिकवेल...''
बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला, ''
मी तुझी प्रार्थना कशी करणार??''
देव म्हणाला, '' परी तुला शिकवेल..''
बाळाने विचारलं, '' मी त्या परी ला ओळखणार
कसं??''
देव म्हणाला , '' ओळखायला वेळ नाही लागणार....पृथ्वीवर लोक तिला 'आई' म्हणतात....
Comments
Post a Comment