उद्योगाचे कानमंत्र
1) कुणीही मनुष्य जन्मतः बिझनेसमन नसतो. ते कौशल्य अनुभवाने मिळवता येते.
2) व्यवसायासाठी राग हा दुर्गुण आहे, पण ईर्ष्यायुक्त आकांक्षा हा गुण ठरतो.
3) कोणताही व्यवसाय तीन वर्षांनंतर बाळसे धरतो. तितके थांबण्याचा संयम हवा.
4) व्यवसाय नफा कमावण्यासाठीच करा, मात्र सुबत्ता आल्यावर समाजाला विसरु नका.
5) प्रतिष्ठा माणसाला नसून पैशाला आहे. पैशाचे आणि गुंतवणुकीचे महत्त्व ओळखा.
6) व्यवसाय करण्यासाठी विशिष्ट शिक्षण गरजेचे नसते. नोटा मोजायला येणे पुरेसे ठरते.
7) ग्राहक देव असतो आणि तो कोणत्याही धर्माचा, भाषेचा असल्याने सर्व भाषा व धर्मांचा आदर करा.
8) ‘दिमाग मेरा पैसा तेरा,’ हे सूत्र लक्षात ठेवा. व्यवसाय हा स्वतःच्या बुद्धिमत्तेने, पण बँकांकडून कर्ज घेऊन करा. मात्र कर्जफेड काटेकोर व नियमितपणे करा.
9) व्यवसायात कोणतेही काम लहान अथवा हलके मानू नका. कष्टाची तयारी ठेवा.
10) संधींवर लक्ष ठेवा. ‘मोका देखके चौका मारनेका,’ हे तत्त्व पाळा.
11) एक व्यवसाय न जमल्यास दुसरा करा, परंतु उद्योग क्षेत्रातून काढता पाय घेऊ नका.
12) भरपूर पैसा मिळवा. तो साचवून ठेऊ नका. कुटूंबासहित पैसा एन्जॉय करा आणि गरजूंना मदतही करा.
13) पैशाचा पाठलाग करत आरोग्याचा बळी देऊ नका. व्यसने, चैनबाजी, दिखावा यापासून दूर राहा.
14) शुद्धता, नम्रपणा, प्रामाणिकपणा आणि आई-वडिलांचे संस्कार धंद्यात यशाला कारणीभूत ठरतात.
15) व्यवसायात समस्या येतातच, परंतु त्यातील ९५ टक्के समस्या संयमाने शांत राहून सोडवायच्या असतात.
Comments
Post a Comment